‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या पर्वात सहभागी झालेल्या अभिनेता प्रसाद जवादेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यामुळेच त्याच्या ‘बिग बॉस’च्या घरातील एक्झिटवर प्रेक्षक नाराज होते. घरातून बाहेर आल्यानंतर प्रसाद जवादेने त्याच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.

प्रसाद जवादेने ‘रेडिओ सिटी’ मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले. त्याने लग्नाबाबतच्या विषयावरही भाष्य केलं. प्रसाद म्हणाला, “मी गेल्या पाच वर्षांपासून सिंगल आहे. प्रेमात पडायला कोणाला नाही आवडणार. आपल्यालाही समजून घेणारं कोणीतरी हवं”.

abeer gulal fame Payal Jadhav write letter after serial off air
“अथक मेहनत करून…”, सहा महिन्यांत बंद होणाऱ्या ‘अबीर गुलाल’ मालिकेतील अभिनेत्रीचं पत्र; म्हणाली, “हाय अंबाबाईची साथ, तर…”
Marathi Actor Abhijeet Kelkar Post For Devendra Fadnavis
“सूर्य पुन्हा एकदा तळपला…”, देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर…
paaru fame Sharayu Sonawane dance on shraddha Kapoor song watch video
Video: श्रद्धा कपूरच्या गाण्यावर ‘पारू’ फेम शरयू सोनावणेनेच्या लावणीचा ठसका; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले, “कडक…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : शत्रूच्या ‘त्या’ बोलण्यानं सूर्याच्या कुटुंबाला आलं टेन्शन; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
Sukh Mhanje Nakki Kay Asta
शालिनी करणार नित्याची हत्या? ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत मोठा ट्विस्ट; पाहा नवीन प्रोमो
Tula Shikvin Changalach Dhada New Promo
भुवनेश्वरी की चारुलता? भर मांडवात अक्षरा लग्न थांबवणार; अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून…; पाहा मालिकेचा प्रोमो
Bigg Boss 18 alice Kaushik is evicted from salman khan show
Bigg Boss 18: सातव्या आठवड्यात घराबाहेर झालेल्या सदस्याचं नाव आलं समोर, टॉप-२मध्ये असण्याची ‘बिग बॉस’ने केली होती भविष्यवाणी
Appi Aamchi Collector
Video : “आता मी या आजाराला…”, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकही झाले भावुक; म्हणाले, “सिंबा तू…”

हेही वाचा>> “आदिलला प्रसिद्धी मिळाल्यावर…”, राखी सावंतच्या लग्नाबाबत वकिलाची प्रतिक्रिया

हेही वाचा>> आलिया-रणबीरच्या लेकीबाबत तज्ञांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले…

‘बिग बॉस मराठी’च्या घरात असं कोणी होतं का?, या प्रश्नावरही प्रसादने अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, “मी याच क्षेत्रात करिअर करणार आहे. त्यामुळे याच क्षेत्रातील एका खूप सुंदर अभिनेत्रीशी माझं लग्न झालं, तर मला आवडेल. याआधीही मी बऱ्याचदा याबाबत बोललो आहे”.

हेही वाचा>>‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच प्रसाद जवादे-अमृता देशमुखचं डेटिंग, पोस्ट शेअर करत म्हणाले…

प्रसादने त्याच्या मनोरंजनविश्वातील क्रशबाबतही या मुलाखतीत खुलासा केला. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्यावर क्रश असल्याचं प्रसाद म्हणाला. “छापा-काटा नाटकादरम्यान माझी मुक्ता बर्वेबरोबर ओळख झाली. मी तिच्याबरोबर कामही केलं आहे. तिची काम करण्याची पद्धत, उत्तम अभिनय या सगळ्या गोष्टींमुळे मला तिच्यावर क्रश आहे. पण ती खूप वर्षांपासून या क्षेत्रात आहे. ती माझी सिनिअर आहे”, असं प्रसादने सांगितलं.