‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या पर्वात सहभागी झालेल्या अभिनेता प्रसाद जवादेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यामुळेच त्याच्या ‘बिग बॉस’च्या घरातील एक्झिटवर प्रेक्षक नाराज होते. घरातून बाहेर आल्यानंतर प्रसाद जवादेने त्याच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसाद जवादेने ‘रेडिओ सिटी’ मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले. त्याने लग्नाबाबतच्या विषयावरही भाष्य केलं. प्रसाद म्हणाला, “मी गेल्या पाच वर्षांपासून सिंगल आहे. प्रेमात पडायला कोणाला नाही आवडणार. आपल्यालाही समजून घेणारं कोणीतरी हवं”.

हेही वाचा>> “आदिलला प्रसिद्धी मिळाल्यावर…”, राखी सावंतच्या लग्नाबाबत वकिलाची प्रतिक्रिया

हेही वाचा>> आलिया-रणबीरच्या लेकीबाबत तज्ञांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले…

‘बिग बॉस मराठी’च्या घरात असं कोणी होतं का?, या प्रश्नावरही प्रसादने अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, “मी याच क्षेत्रात करिअर करणार आहे. त्यामुळे याच क्षेत्रातील एका खूप सुंदर अभिनेत्रीशी माझं लग्न झालं, तर मला आवडेल. याआधीही मी बऱ्याचदा याबाबत बोललो आहे”.

हेही वाचा>>‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच प्रसाद जवादे-अमृता देशमुखचं डेटिंग, पोस्ट शेअर करत म्हणाले…

प्रसादने त्याच्या मनोरंजनविश्वातील क्रशबाबतही या मुलाखतीत खुलासा केला. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्यावर क्रश असल्याचं प्रसाद म्हणाला. “छापा-काटा नाटकादरम्यान माझी मुक्ता बर्वेबरोबर ओळख झाली. मी तिच्याबरोबर कामही केलं आहे. तिची काम करण्याची पद्धत, उत्तम अभिनय या सगळ्या गोष्टींमुळे मला तिच्यावर क्रश आहे. पण ती खूप वर्षांपासून या क्षेत्रात आहे. ती माझी सिनिअर आहे”, असं प्रसादने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 fame prasad jawade talk about marriage kak