‘बिग बॉस मराठी’च्या चौथं पर्व सध्या रंजक वळणावर आहे. घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद, मतभेद सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. शिवाय राखी सावंतने ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये इतर सदस्यांबरोबर वाद करण्यास सुरुवात केली आहे. राखीने गेल्या भागामध्ये तिच्या अंगात भूत असल्याचं नाटक केलं होतं. आता तिने चक्क अपूर्वा नेमळेकरबरोबर हाणामारी करण्यास सुरुवात केली आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटव्दारे एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी घरामध्ये राडा करताना दिसत आहे. राखीने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील भांडी फोडली आहेत.
पाहा व्हिडीओ
घरातील सदस्यांनी कॉफी लपवली असल्याचं राखीचं म्हणणं आहे. ती म्हणते, “आताही माझी कॉफी द्या.” राखी संतापली असताना अपूर्वाबरोबर तिचा वाद सुरू होतो, “आहे तुझ्यात दम तर ये” असं राखी अपूर्वाला म्हणते. दरम्यान दोघींमध्ये हाणामारीला सुरुवात होते.
स्वयंपाक घरातील सामानाचं राखी नुकसान करते. पण त्याचबरोबरीने ती अक्षय केळकरच्या अंगावरही धावून जाते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर राखी खूप अती करत आहे, या घरामध्ये नकारात्मकता निर्माण झाली आहे असं प्रेक्षक म्हणत आहेत. आता येत्या भागामध्ये राखी व अपूर्वाचं हे भांडण कुठे पोहचणार हे पाहावं लागेल.