यंदा बिग बॉसचे चौथे पर्व विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून त्यात दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि त्यांचा खेळ यावरुन बिग बॉसचे चौथे पर्व गाजताना दिसत आहे. यंदा बिग बॉसचे पर्व ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. नुकतंच यंदाच्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची तारीख समोर आली आहे.
छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेला आणि रसिकांची मनं जिंकणारा बिग बॉस मराठीचे चौथे पर्व २ ऑक्टोबर पासून सुरु झाले. या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. दिवसेंदिवस येणारे ट्वीस्ट, खेळ, होणारे वाद, चावडीवर घेतली जाणारी शाळा यामुळे हे पर्व चर्चेत राहिले. मात्र लवकरच बिग बॉस मराठीचे चौथे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
आणखी वाचा : “बिग बॉस आदेश देत आहे की…” आवाजामागचे गुपित उलगडले
सध्या बिग बॉस मराठीच्या घरात किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, आरोह वेलणकर हे सदस्य राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातील ७६ वा दिवस पार पडला. त्यामुळे आता केवळ दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. येत्या नववर्षाच्या सुरुवातीला बिग बॉस मराठीचे चौथे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
बिग बॉस मराठी ४ चा ग्रँड फिनाले येत्या ८ जानेवारी २०२३ ला संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण कलर्स मराठी वाहिनीने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी सात वाजता बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्याच्या जय्यत तयारीला देखील सुरूवात झाली आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.