Bigg Boss Marathi 4 Final Winner : ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा रंजक प्रवास आता लवकरच संपणार आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरवात झाली आहे. यंदा ‘बिग बॉस’ मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या सोहळ्यात पर्वातून बाहेर पडलेले स्पर्धकदेखील सहभागी झाले आहेत. यातीलच एका स्पर्धक मेघा घाडगेने कोण विजेता होणार यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ठसकेबाज लावणी व अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारी मेघा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. मेघाने तिचा लावणीतील ठसकेबाजपणा ‘बिग बॉस’च्या घरातही दाखवला होता. या सोहळ्यात महेश मांजरेकरांनी तिला प्रश्न विचारला “तुझ्यामते कोण विजेता होईल?” त्यावर तिने उत्तर दिले की “कोणाला अपेक्षा नसेल पण मी किरण मानेच नाव घेते, तो होऊ शकतो विजेता.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
हेही वाचा – “बाकी ते ठरवतीलचं…” रुचिरा जाधवने केली ‘बिग बॉस मराठी’च्या निर्मात्यांची पोलखोल
दरम्यान ‘बिग बॉस खबरी’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील टॉप ५ स्पर्धकांचा व्होटिंग ट्रेंड शेअर करण्यात आला आहे. या ट्रेंडनुसार अभिनेता किरण माने पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ राखी सावंत दुसऱ्या स्थानावर, अपूर्व नेमळेकर तिसऱ्या, अमृता धोंगडे चौथ्या आणि अक्षय केळकर पाचव्या स्थानावर आहे. मात्र हे ट्रेंड कितपत खरा आहे, याबद्दल चाहते शंका उपस्थित करत आहे. तर दुसरीकडे यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण जिंकणार हे पाहणे? महत्त्वाचे ठरणार आहे.