BB4 Marathi Grand Premiere News : छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त तरीही लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’ला ओळखले जाते. आज रविवार २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरु झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. बिग बॉस मराठी सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नाव समोर येण्यास आली आहे.

बिग बॉस मराठी ४ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉस मराठी ४ चे पुढचे १०० दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. कलर्स मराठीवर नुकतंच याचा ग्रँड प्रीमियर पार पडला. महेश मांजरेकरांनी घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांचे अनोख्या स्टाइलमध्ये स्वागत केले आहे.

बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांला पहिल्याच दिवशी बिग बॉसने दणका दिला आहे. या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर बिग बॉसने या सर्व स्पर्धकांना एका विशिष्ट रंगाचे बँड दिले आहेत. या बँडनुसार त्यांना घरातील कामांची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. यात स्वयंपाक घरातील जेवण बनवणे ते साफसफाई अशी कामे असणार आहेत.

यंदा घरातून चार स्पर्धक लगेचच बाहेर पडणार असल्याची घोषणा बिग बॉसने केली आहे. उद्याच्या भागात आपल्याला नक्की कोण बाहेर पडणार हे पाहता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये औत्सुक्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे

  • तेजस्विनी लोणारी
  • प्रसाद जवादे
  • अमृता धोंगडे
  • निखिल राजशिर्के
  • किरण माने
  • समृद्धी जाधव
  • अक्षय केळकर
  • अपूर्वा नेमळेकर
  • योगेश जाधव
  • यशश्री मसुरकर
  • अमृता देशमुख
  • विकास सावंत
  • मेघा घाडगे
  • त्रिशुल मराठे
  • रुचिरा जाधव
  • रोहित शिंदे

Live Updates

बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. तर घरातही यंदा चाळ संस्कृती पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीतील सर्व स्पर्धकांची नाव समोर आली आहेत.

21:22 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ मराठीत सहभागी होणाऱ्या शेवटच्या स्पर्धकाचे नाव समोर

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात डॉ. रोहित शिंदे सहभागी होणार आहे. रोहित हा रुचिरा जाधवचा बॉयफ्रेंड आहे. पण त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे. त्याने ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे.

https://www.instagram.com/p/CjN_a-QDP4R/?hl=en

21:18 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ मराठीमध्ये सहभागी होणार 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम माया

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील माया फेम अभिनेत्री रुचिरा जाधव ही सहभागी होणार आहे. या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली.

https://www.instagram.com/p/CjN-0jjja7Q/?hl=en

21:03 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ मराठीच्या चौदाव्या स्पर्धकाचे समोर

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात १४ व्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. त्रिशूल मराठे हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होणार आहे. त्रिशूल मराठे हा सर्वसामान्यातून निवडून गेलेल्या स्पर्धकातील एक आहे.

https://www.instagram.com/p/CjN9t4FDpBL/?hl=en

20:56 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ मराठीमध्ये सहभागी होणार लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे सहभागी होणार आहे. तिने तिच्या लावणीतून सर्वांचेच चांगलेच लक्ष वेधून घेतले होते.

https://www.instagram.com/p/CjN7fb3vsEO/?hl=en

20:36 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’ चौथ्या पर्वात प्रसिद्ध डान्सर विकास सावंत सहभागी

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात प्रसिद्ध डान्सर विकास सावंत सहभागी होणार आहे. त्याने आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. अभिनेता सलमान खान ते सनी लिओनीबरोबरही तो झळकला आहे. यावेळी त्याने महेश मांजरेकरांना मी तुम्हाला डान्स शिकवेन असे सांगितले.

https://www.instagram.com/p/CjN5jbbv9ak/?hl=en

20:29 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात सहभागी होणाऱ्या आणखी एका स्पर्धकाचे नाव समोर

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी होणाऱ्या अकराव्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. आरजे, लेखक अशी ओळख असलेली अमृता देशमुख यंदा बिग बॉसच्या घरात सहभागी होणार आहे.

https://www.instagram.com/p/CjN3KIUPHkR/?hl=en

20:26 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात सहभागी होणाऱ्या दहाव्या स्पर्धकाचे नाव समोर

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी होणाऱ्या दहाव्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. टूक टूक राणी अशी ओळख असलेली यशश्री मसूरकर यंदा बिग बॉसच्या घरात सहभागी होणार आहे.

https://www.instagram.com/p/CjN4Ykiv1Sh/?hl=en

20:18 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ मराठीच्या सहभागी होणाऱ्या आणखी एका स्पर्धकाचे नाव समोर

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी होणाऱ्या आणखी एका स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. योगेश जाधव हा यंदा बिग बॉसच्या घरात सदस्य म्हणून सहभागी होणार आहे. तो प्रोफेशनल फायटर आहे.

https://www.instagram.com/p/CjN1zSoPjD8/?hl=en

20:01 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : 'शेवंता' फेम अपूर्वा नेमळेकर 'बिग बॉस' मराठीमध्ये होणार सहभागी

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची यंदा घरात जादू पाहायला मिळणार आहे. यावेळी तिने मी जिंकण्यासाठी होकार दिला असे महेश मांजरेकरांना ठणकावून सांगितले.

https://www.instagram.com/p/CjN0sSRvmDI/?hl=en

19:45 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : अभिनेता अक्षय केळकर बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चे चौथ्या पर्वातील सातव्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. अभिनेता अक्षय केळकर हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होणार आहे. निमा डेंजोप्पा या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून अक्षय केळकरला ओळखले जाते.

https://www.instagram.com/p/CjNyzHuPzuA/?hl=en

19:37 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सदस्याचे नाव समोर

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चे चौथ्या पर्वातील सहाव्या सदस्याचे नाव समोर आले आहे. समृद्धी जाधव ही बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होणार आहे. समृद्धी ही स्प्लिट्सविला १३ मध्ये सहभागी झाली होती. यात तिने सर्वांचेच चांगलेच लक्ष वेधून घेतले होते.

https://www.instagram.com/p/CjNwxQcD9p7/?hl=en

19:28 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : अभिनेते किरण माने 'बिग बॉस' मराठीमध्ये सहभागी

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चे चौथ्या पर्वात अभिनेते किरण माने सहभागी होणार आहेत. मुलगी झाली हो या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. यावेळी महेश मांजरेकरांनी किरण मानेंचे कौतुक केले. तर दुसरीकडे आपल्या मुलीला भेटून किरण माने भावूक झाले.

https://www.instagram.com/p/CjNvM-ADLR1/?hl=en

19:17 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ मराठीत सहभागी होणार 'मिसेस मुख्यमंत्री', अमृता धोंगडे ठरली चौथी स्पर्धक

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात मिसेस मुख्यमंत्र्यांची जादू पाहायला मिळणार आहे. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता धोंगडे ही यात सहभागी झाली आहे.

https://www.instagram.com/p/CjNuii3jlYl/?hl=en

19:13 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या स्पर्धकाचे नाव समोर

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चे चौथ्या पर्वातील दोन स्पर्धकांची नावं समोर आल्यानंतर आता तिसऱ्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. निखिल राजशिर्के हा बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी होणारा तिसरा स्पर्धक आहे.

https://www.instagram.com/p/CjNu9YUDe1V/?hl=en

19:09 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या स्पर्धकाचे नाव समोर

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चे चौथ्या पर्वातील स्पर्धकांची नाव समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या पर्वातील दुसऱ्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. प्रसाद जवादे हा बिग बॉस च्या चौथ्या पर्वात सहभागी होणारा दुसरा स्पर्धक ठरला आहे.

https://www.instagram.com/p/CjNsYrDP8br/?hl=en

19:05 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या स्पर्धकाचे नाव समोर

Bigg Boss Marathi 4 : बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या या पर्वातील पहिल्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. तेजस्विनी लोणारी ही बिग बॉस च्या चौथ्या पर्वात सहभागी होणारी पहिली स्पर्धक ठरली आहे.

https://www.instagram.com/p/CjNq24dvkUk/?hl=en

18:44 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ मराठीच्या घराची खास झलक

बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.‘बिग बॉस’चं घर कसं असणार हे पाहण्यासाठीही प्रेक्षक आतुर आहेत. चाळ संस्कृतीची थीम असलेल्या ‘बिग बॉस’च्या घराची खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत

पाहा : चाळ संस्कृतीची थीम असलेल्या ‘बिग बॉस’च्या घराची खास झलक

18:39 (IST) 2 Oct 2022
‘बिग बॉस’च्या घरात दिसणार ‘हे’ कलाकार ? संभाव्य नावाची यादी समोर

बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता पाहायला मिळत आहे. यातील संभाव्य कलाकरांच्या नावाची यादी समोर आली आहे.

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार ‘हे’ कलाकार ? संभाव्य नावाची यादी समोर

18:33 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : यंदाचं पर्व 'ऑल इज वेल' थीमवर आधारित

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे. यात भांडणं असणार नाहीत असं बोललं जातं आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत एक वेगळीच उत्सुकता आहे.

18:31 (IST) 2 Oct 2022
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी ४ कधी आणि कुठे पाहता येणार?

बिग बॉस मराठी ४ चा प्रीमयर आज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. त्यानंतर पुढचे १०० दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसेल. बिग बॉस मराठी ४ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. तर आठवड्याअखेर म्हणजेच वीकेंडला शनिवार आणि रविवारी ९.३० वाजता प्रसारित केला जाईल.

BB4 Marathi Grand Premiere News : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून 'बिग बॉस मराठी'ला ओळखले जाते. आज रविवार २ ऑक्टोबरपासून 'बिग बॉस मराठी'चे चौथे पर्व सुरु झाले आहे. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे.

Story img Loader