सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची चर्चा आहे. भांडण, वाद, मारामाऱ्या अशा गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असणारा हा कार्यक्रम टीआरपीच्या स्पर्धेमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. प्रेक्षक दररोज हा कार्यक्रम आवडीने पाहतात. आठवड्याच्या शेवटी महेश मांजरेकर यांची चावडी असते. त्यानंतर सर्वात कमी मत मिळालेला सदस्य स्पर्धेतून बाहेर पडतो. निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे, योगेश जाधव यांच्यानंतर ‘बिग बॉस’च्या घरातून त्रिशूल मराठे बाहेर पडाला.

या रविवारच्या विशेष भागाला अभिनेता जितेंद्र जोशीने हजेरी लावली होती. त्याचा ‘गोदावरी’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी जितेंद्र बिग बॉस मराठीमध्ये उपस्थित होता. कार्यक्रमादरम्यान त्याने बिग बॉसच्या घरातल्या सर्व स्पर्धकांशी संवाद साधला. तेव्हा त्यांच्याशी बोलताना जितेंद्रने विकास सावंतचे तोंड भरुन कौतुक केले. जितेंद्र म्हणाला, ‘मला तिकडच्या एका माणसाची खूप भीती वाटते.’ त्यावर मांजरेकरांनी ‘कोणाची?’ असे विचारले. त्यावर त्याने ‘विकास’ असे उत्तर दिले.

Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Video Shows Best Friends Love
एक अतूट नातं! बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर ‘तिने’ नकळत स्पर्श केला मैत्रिणीच्या पायांना; आजींचा VIDEO एकदा बघाच
Mother left her children on road and ran away motherhood shocking video viral on social media
“त्यापेक्षा जन्मच नव्हता द्यायचा ना”, तिला पोटच्या मुलांचीही नाही आली दया, निष्ठूर आईचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Marathi actress Tejashri Pradhan talk about social media
“फक्त हे मृगजळासारखं…”, सोशल मीडियाबाबत तेजश्री प्रधानने मांडलं मत; तरुणपिढीला सल्ला देत म्हणाली, “आपण आयुष्यात…”

आणखी वाचा – “त्यांना पद्मश्री…”; प्रशांत दामलेंच्या विक्रमी नाट्यप्रयोगावर ‘तारक मेहता…’ मालिकेतील अभिनेत्याची प्रतिक्रिया

पुढे तो म्हणाला, “विकासची मला खूप भीती वाटते. मी प्रामाणिकपणे तुला सांगतो की, बापरे.. बापरे.. बापरे.. पहिल्या दिवशी आलेला विकास आणि काल-परवापर्यंतच्या टास्कमधला विकास, हा जो प्रवास आहे ना मित्रा तुझा.. याबद्दल मी तुला सांगू शकत नाही. ज्या ज्या माणसांनी तुला लहानपणापासून हिणवलं आहे ना, त्या त्या माणसांच्या कानशिलात लगावली आहेस तू. खूपच मस्त. काय टास्क खेळतोयस तू. सुरुवातीला तू किरणच्या प्रभावाखाली होतास. पण आता मात्र तू स्वतंत्र खेळतोयस हे दाखवून दिलं आहेस. हा या घरातील सर्वात मोठा खेळाडू आहे.” मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या साप्ताहिक कार्यामध्ये विकास सावंत उत्तम खेळला होता. शनिवारच्या भागामध्ये महेश मांजरेकर यांनीही त्याला शाबासकी दिली होती.

आणखी वाचा – आलिया की रणबीर, कोणासारखी दिसते नात? आजी नीतू कपूर म्हणाल्या…

‘गोदावरी’ या चित्रपटाला जितेंद्र जोशी, नीना कुलकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव आणि विक्रम गोखले अशी तगडी स्टारकास्ट लाभली आहे. निखिल महाजन दिग्दर्शित आणि प्राजक्त देशमुख लिखित या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

Story img Loader