‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस रंजक होत आहे. घरात आता मोजकेच सदस्य उरले आहेत. काही दिवसांनंतर या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडेल. यंदाच्या सीझनमध्ये सतत चर्चेत राहिलेला स्पर्धक म्हणजे किरण माने. किरण यांची विकास सावंतशी असलेली मैत्री असो वा अपूर्वा नेमळेकरबरोबर भांडण सगळं काही चर्चेचा विषय ठरलं. आता किरण यांच्या लेकीने त्यांच्या खेळाबाबत आपलं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Video : चक्क ‘बिग बॉस’नेच घरामध्ये केला प्रवेश, पहिल्यांदाच असं काही घडलं की सदस्यही बघतच बसले

‘मराठी चस्का’ या युट्यूब चॅनलला किरण माने यांच्या मुलीने मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, “मास्टरमाइंड हा शब्द पप्पांसाठी वापरतात तो मला अगदी योग्य वाटतो. मला याचा अभिमान आहे की त्यांचा खेळ अगदी परफेक्ट सुरू आहे. सुरुवातीला ते टास्कमध्ये कमी खेळत होते. पण आता ते टास्क जीव तोडून खेळतात. आता त्यांची गाडी अगदी रुळावर आहे.”

“सी-सॉ टास्करदरम्यान पप्पा म्हणाले की काहीही झालं तरी मी जागेवरुन उठणार नाही. ते जसं ठामपणे सांगत होते तिथेच माझ्या लक्षात आलेलं की ते शेवटपर्यंत जागेवरुन उठणार नाहीत. या टास्कदरम्यान मला एक वेगळेच पप्पा बघायला मिळाले. या टास्कवेळी त्यांच्यावर शब्दांचा तसेच पाण्याचा मारा होत होता. पण शेवटपर्यंत ते बसून राहिले.”

आणखी वाचा – Video : “रडायचं नाही आता लढायचं” आई-वडिलांना पाहून अमृता धोंगडेची झाली अशी अवस्था, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

पुढे ती म्हणाली, “हा टास्क मी त्यांची मुलगी आहे म्हणून मला बघवतही नव्हता. खूप वाईट वाटलं. खूप रडायला येत होतं की हे काय सुरू आहे. त्यांच्याबाबत काही बाहेरच्या गोष्टी बोलल्या गेल्या ते माझ्या आईलाही आवडलं नाही. माझ्या आजीला हा टास्क पाहून तर प्रचंड त्रास झाला. पण आम्ही तिला समजावलं.” शिवाय किरण यांच्या घरी लग्नकार्य पार पडलं. तेव्हा त्यांची लेक वडिलांच्या आठवणीत रडत होती. तर घरातील इतर मंडळींनाही किरण यांची खूप आठवण येत होती.