कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या जोरदार गाजतय. टिव्ही जगतातील सर्वात वादग्रस्त शो अशी ओळख असलेल्या बिग बॉस मराठी मध्ये यंदा अपूर्वा नेळेकर, अक्षय केळकर, किरण माने, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे असे प्रसिद्ध कलाकार सहभागी झाले आहेत आणि दरवर्षी प्रमाणे यावेळीही बिग बॉसच्या घरात जोरदार राडे, भांडणं आणि वाद पाहायला मिळत आहे. शोच्या सुरुवातीलाच पडलेल्या दोन टीममध्ये रोज काही ना काही वाद होताना दिसत आहेत. पण नुकत्याच आठवड्याअखेर झालेल्या एलेमिनेशनने घरातील सर्वच सदस्यांना धक्का बसला आहे.
बिग बॉस मध्ये दर आठवड्याला एका सदस्याचं एलेमिनेशन होतं म्हणजेच एक सदस्य घरातून बाहेर पडतो. पण या आठवड्यात मात्र एकाच वेळी दोन एलेमिनेशन करत बिग बॉसने सर्वच सदस्यांना धक्का दिला. बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात यशश्री मसुरकरने निरोप घेतला. तब्बल ४९ दिवसांनंतर यशश्रीचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी स्वतः किरण माने यांना घरातून बाहेर पडावे लागेल असं सांगितलं. ज्याने सर्वांना मोठा धक्का बसला.
आणखी वाचा- “मला टकला मुलगा नवरा म्हणून…” अपूर्वा नेमळेकरने बिग बॉसच्या घरात केलेलं वक्तव्य चर्चेत
या आठवड्यात महेश मांजरेकर यांनी बिग बॉसच्या चावडीवर संपूर्ण आठवड्याचा आढावा घेत. घरातील सदस्यांना खासकरून अमृता धोंगडेला चांगलंच सुनावलं. याशिवाय संपूर्ण आठवड्यातील टास्क, वाद, भांडणं यांचा हिशोब महेश मांजरेकर यांनी घेतला. यशश्री मसुरकर घरातून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या एलेमिनेशची वेळ आली तेव्हा महेश मांजरेकर स्वतः बिग बॉसच्या घरात आले आणि त्यांनी किरण माने यांना घरातून बाहेर पडावं लागेल असं सांगितलं पण त्याच वेळी ते घरातून बाहेर जात आहेत पण खेळातून नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं.
आणखी वाचा- Video: गर्लफ्रेंडचं लग्न ठरल्यानंतर काय? किरण मानेंची ‘बिग बॉस मराठी’मधील कविता व्हायरल
किरण माने घरातून तर बाहेर पडलेत पण आता पुढे काय? त्यांना सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. अर्थात यामधून किरण मानेना कोणता खास अधिकार मिळणार का? किंवा त्यांना शिक्षा म्हणून सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात आलेलं आहे? याची उत्तर जाणून घेण्यास प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असून ही उत्तरं प्रेक्षकांना आगामी एपिसोडमध्येच मिळणार आहेत.