‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस रंजक होत आहे. घरात आता मोजकेच सदस्य उरले आहेत. काही दिवसांनंतर या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडेल. पण त्याचपूर्वी हा आठवडा घरातील सदस्यांसाठी फॅमिली विक असणार आहे. म्हणजेच सदस्यांना त्यांच्या घरातील मंडळी भेटण्यासाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “माझे पप्पा मास्टरमाइंड” किरण मानेंची लेक स्पष्टच बोलली, ‘तो’ टास्क पाहिल्यानंतर बायको व आईही भडकली

कलर्स मराठी वाहिनीने यादरम्यानचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किरण माने यांची पत्नी आणि दोन मुलं ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आलेले दिसत आहेत. किरण आपल्या कुटुंबातीला सदस्यांना पाहून भारावून जातात.

पाहा व्हिडीओ

पत्नी, मुलगा व मुलगीला पाहून किरण त्यांना घट्ट मिठी मारतात. पण किरण यांची पत्नी राखीचं नाव घेत म्हणते, “तुम्हाला इथे चांगली करमणूक आहे हो ना राखी” असं म्हणते. हे ऐकून घरातील सारे सदस्य हसू लागतात. त्यानंतर राखी तिच्या हातात असलेली बाहुली किरण यांच्या पत्नीच्या हातात देते. “आता याला सांभाळा.” असं राखी किरण यांच्या पत्नीला म्हणते.

आणखी वाचा – Video : चक्क ‘बिग बॉस’नेच घरामध्ये केला प्रवेश, पहिल्यांदाच असं काही घडलं की सदस्यही बघतच बसले

यावर किरण यांची पत्नी म्हणते, “मी यांना तेच म्हणणार होते की कधी आपल्या बाळांचे तरी कपडे बदलले होते का?” हे ऐकून घरातील सदस्यांना हसू अनावर होतं. किरण यांच्या पत्नीने घरात येताच घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं एवढं नक्की.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 kiran mane wife and two children enter in the house video goes viral on social media see details kmd