‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस रंजक होत आहे. घरात आता मोजकेच सदस्य उरले आहेत. काही दिवसांनंतर या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडेल. पण त्याचपूर्वी हा आठवडा घरातील सदस्यांसाठी फॅमिली विक आहे. म्हणजेच सदस्यांना त्यांच्या घरातील मंडळी भेटण्यासाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये येत आहेत.

आणखी वाचा – Video : “बाबा तू ये ना” वडिलांना पाहून चिमुकल्याच्या भावना अनावर, आरोह वेलणकरच्या लेकाने सगळ्यांनाच रडवलं

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
ram gopal verma pushpa 2 review
राम गोपाल वर्मा यांनी सांगितला ‘पुष्पा २’चा अनुभव; पोस्ट शेअर करत म्हणाले, “त्याची प्रतिमा…”
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

कोणाचे आई-वडील, कोणाची पत्नी तर कोणाची मुलं ‘बिग बॉस मराठी’च्या फॅमिली विक आठवड्यात येताना दिसत आहेत. दरम्यान प्रसाद जावेदेचे आई-वडिलही त्याला भेटण्यासाठी घरामध्ये आले. यावेळी प्रसादचं एक वेगळंच रुप पाहायला मिळालं.

प्रसाद बऱ्याचदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये स्वतःच्या विचारांत गुंतलेला दिसला. याबाबत त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं. पण जेव्हा आई-वडील घरात आले तेव्हा त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. अगदी लहान मुलासारखा तो आईच्या कुशीत जाऊन रडला. शिवाय बाबांनाही त्याने घट्ट मिठी मारली. प्रसादच्या आईने यावेळी इतर सदस्यांनाही प्रेम दिलं.

आणखी वाचा – दिवस-रात्र नशेमध्येच असायचे खरे ‘बिग बॉस’, गंभीर आजारामुळे मरणाच्या दारात पोहोचले, रुग्णालयामध्ये घडलं असं काही…

यावेळी प्रसादच्या आईने अपूर्वालाही जवळ घेतलं. प्रसादच्या आईने कोणाला दुखावू नका तसेच कोणाबाबत मनात राग ठेवू नका असा सगळ्यांना सल्ला दिला. यावेळी अपूर्वा नेमळेकरने प्रसादच्या आईची माफी मागितली. खरं तर यावेळी प्रसादच्या आईला पाहून घरातील सगळेच सदस्य ढसाढसा रडू लागले.

Story img Loader