‘बिग बॉस मराठी ४’चा महाअंतिम सोहळा अवघ्या काही दिवसांवरच आहे. शेवटच्या आठवड्यामध्ये पार पडलेलं नॉमिनेशन पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. यावेळी प्रसाद जवादेला ‘बिग बॉस मराठी ४’चा निरोप घ्यावा लागला. प्रसाद घरातून बाहेर पडताच बिग बॉस मराठी ४’चा हा निर्णय प्रेक्षकांना मात्र पटलेला नाही. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक भावूक पोस्टही शेअर केली.
आणखी वाचा – मुलगा ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी घरी आणणार का? पहिल्यांदाच शिव ठाकरेच्या आईने दिलं उत्तर, म्हणाली, “माझा लेक…”
बिग बॉस मराठी ४’च्या घरातून बाहेर येणं प्रसादसाठीही धक्कादायक होतं. त्याला या गोष्टीचं दुःख असल्याचं त्याने स्वतः पोस्टद्वारे म्हटलं आहे. तर प्रेक्षकांनीही प्रसादने घराबाहेर येणं हा निर्णय चुकीचा आहे असं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर प्रार्थना बेहरेनेही प्रसादने पोस्ट शेअर करताच यावर कमेंट केली आहे.
या पुढे कोणत्याही कलाकारांनी ‘बिग बॉस मराठी’मध्ये भाग घेऊ नये. फुकट तुमचाही आणि आमचाही वेळ वाया घालवू नका. हा ‘बिग बॉस मराठी’चा हा शेवटचा सीझन ठरवावा. असं एका प्रेक्षकाने प्रसादच्या पोस्टवर कमेंट केली आहे. तर प्रसादनेही हात जोडत या कमेंटला उत्तर दिलं आहे. तसेच प्रसाद घराबाहेर येणं हा निर्णय अयोग्य होता असं अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे.
प्रार्थना बेहरेने हार्ट इमोजी कमेंटद्वारे शेअर केली आहे. तसेच प्रेक्षकांनी विविद कमेंट करत ‘बिग बॉस मराठी’वर संताप व्यक्त केला आहे. आता राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अक्षय केळकर, आरोह वेलणकर, अपूर्वा नेमळेकर हे सदस्य अखेरच्या आठवड्यात दिसणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’चं विजेता आता कोण ठरणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.