‘बिग बॉस मराठी ४’च्या महाअंतिम सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या पर्वाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रसाद जवादेला घराबाहेर पडावं लागलं. दरम्यान प्रसाद घराबाहेर आल्यानंतर प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली. तो या घरामध्ये उत्तम पद्धतीने खेळला असं प्रेक्षक सतत म्हणत आहेत. ‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रसादही भावूक झाला. तसेच त्याने अमृता देशमुखबरोबर असलेल्या नात्याविषयीही भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “कोणत्याही कलाकाराने यापुढे…” प्रसाद जवादेच्या ‘त्या’ पोस्टनंतर ‘बिग बॉस मराठी’वर भडकले प्रेक्षक, प्रार्थना बेहरेनेही केली कमेंट

मध्यंतरी अमृता व प्रसादच्या नात्याबाबत बऱ्याच चर्चा रंगत होत्या. ‘बिग बॉस मराठी ४’च्या घरामध्ये प्रसादने तिला प्रपोजही केलं. या दोघांमध्ये नेमकं काय नातं आहे? असा प्रश्नही प्रेक्षकांना होता. आता प्रसादने स्वतःच अमृता व त्याच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. तसेच तिच्याशी बोलण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

काय म्हणाला प्रसाद जवादे?
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद म्हणाला की, “मला सगळ्यात आधी अमृता देशमुखलाच फोन करायचा आहे. ती माझ्या आयुष्यामधील महत्त्वाचा भाग आहे. घराच्या बाहेर आल्यानंतर कोणाचे काय कसे विचार बदलतात हे सांगता येत नाही. पण मला तिला भेटायला, तिच्याबरोबर मैत्री करायलाही नक्की आवडेल. तिच्याबाबत माझ्या मनात एक हळवा कोपरा आहे.”

आणखी वाचा – ‘ती’ गालावरची खळी नव्हे तर जखम, ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरांची झाली होती वाईट अवस्था, सर्जरीही केली पण…

“सुरुवातीला १६ लोकांपैकी माझी बाजू घेऊन कोणी बोललं असेल तर ती फक्त अमृता देशमुखे होती. त्या गोष्टीचा आदर मी कायमच ठेवतो. हा आदर कायमच माझ्या मनात असेल. नंतर खेळ पुढे जात होता. वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. पण आम्हा दोघांनाही एकमेकांच्या मनातलं कळायचं. माझ्या मनातलं तिला कळायचं असं मला वाटतं. तेच मला तिला भेटून विचारायचं आहे.” अमृता व प्रसादमध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे हे त्याच्या बोलण्यामधून स्पष्ट झालं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 prasad jawade talk about his relationship with amruta deshmukh see details kmd