‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मध्यंतरी किरण माने यांना सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आलं. आता ‘बिग बॉस’ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासामध्ये असं काहीतरी पहिल्यांदाच घडताना दिसणार आहे. नवीन चार सदस्यांची ‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’मध्ये मोठा ट्विस्ट, पहिल्यादांच होणार चार वाइल्ड कार्ड एन्ट्री, ‘ते’ स्पर्धक कोण असणार?

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोद्वारे चार नवीन सदस्य लवकरच घरात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे चार सदस्य कोण असणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. पण आता ‘बिग बॉस मराठी’च्या आधीच्या सीझनमधील स्पर्धक पुन्हा या सीझनमध्ये पाहायला मिळणार का? अशी एक नवी चर्चा सुरु झाली आहे.

त्याचं झालं असं की ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो आला. त्यानंतर अभिनेता व ‘बिग बॉस मराठी’च्या आधीच्या सीझनमध्ये सहभागी झालेला स्पर्धक पुष्कर जोगने यावर कमेंट केली. “एक नंबर” असं त्याने कमेंट करत म्हटलं.

पुष्करच्या या कमेंटनंतर “तू पण वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून ये.” असं एका चाहत्याने त्याला म्हटलं. यावर पुष्करने उत्तर देत केमंट केली की, “कदाचित सरप्राईज असू शकतं.” पुष्करच्या या कमेंटनंतर तो वाईल्ड कार्ड एण्ट्री म्हणून घरात प्रवेश करणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

Story img Loader