‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे. एकूण चार स्पर्धकांची घरा एन्ट्री झाली आहे. खी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जग्गनाथ या सदस्यांनी घरात दमदार एन्ट्री केली. राखीला घरात पाहिल्यानंतर इतर सदस्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. राखीने घरात प्रवेश करताच वादाला सुरुवात झाली आहे.
राखीने घरात प्रवेश केला अन् तिने डायलॉग बाजी करण्यासा सुरुवात केली. अपूर्वा नेमळेकरला तर तिने चक्क ”ए शेवंते” अशी हाक मारली. आता राखीने घरात जाताच तेजस्विनी लोणारीशी वाद घालायला सुरुवात केली आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रहिवासी संघ बोर्डवर पहिल्या नंबरला कोणाच्या नावाची पाटी लागणार यावरून तेजस्विनी व राखीमध्ये वाद रंगताना दिसत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss 16 : ‘बिग बॉस १६’मध्ये लवकरच गोल्डन बॉयची एन्ट्री होणार, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण
तेजस्विनी म्हणते, राखी मॅडम माझा नंबर आहे तो. राखी यावर उत्तर देत म्हणाली, “बरोबर आहे तो.” “मी माझ्या एक नंबरवर पाटी लावणार.” असं तेजस्विनी स्पष्टपणे राखीला सांगते. दोघींमध्ये वाद रंगत असताना एकमेकींच्या नावाची पाटी तोडणार असल्याचं त्या बोलतात. यावर राखी म्हणते, “तोड, आता तुझा एक हात तुटला आहे. दुसरा हातही तुटेल.” हा वाद आता कितपत वाढणार हे येत्या भागामध्ये कळेलच.