‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. प्रसाद जवादेने रविवारी घरातून एक्झिट घेतल्यानंतर आता फक्त सहा सदस्य राहिले आहेत. या आठवड्यात आणखी सदस्याचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपणार आहे. त्यानंतर यंदाच्या पर्वाचे टॉप ५ स्पर्धकांमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.
बिग बॉसने घरातील टॉप सहा सदस्यांना खास सरप्राइज दिलं आहे. घरात एन्ट्री केल्यापासूनच प्रेक्षकांसह घरातील इतर सदस्यांचही पूरेपूर मनोरंजन करणाऱ्या राखीलाही बिग बॉसने खास सरप्राइज दिलं. कलर्स मराठीच्या पेजवरुन याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. राखीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास व्हिडीओद्वारे दाखविण्यात येणार आहे. त्याशिवाय राखीसाठी लाइव्ह ऑडियन्स आल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे.
हेही वाचा>> ‘ये है मोहब्बते’ फेम ‘रुही’ने १५व्या वर्षी खरेदी केलं कोट्यवधींचं घर, फोटो शेअर करत म्हणाली…
बिग बॉसने दिलेलं हटके सरप्राइज पाहून राखी भावूक झाली. “बिग बॉस ज्या नावाने मला ओळखतात, मी ते जगते. आज मी धन्य झाले बिग बॉस”, असं व्हिडीओमध्ये राखी म्हणताना दिसत आहे. राखी या व्हिडीओमध्ये रडतानाही दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा>> …म्हणून रितेश देशमुख मराठी चित्रपटांत लावतो वडिलांचं नाव, कारणही आहे खास
एकाने कमेंट करत “राखीच्या नादात प्रसादला घालवलं. ही पैसे न्यायलाच आली आहे”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “फालतू सीझन आहे हा”, अशी कमेंट केली आहे. “प्रसाद जवादे या शोचा विजेता आहे”, असंही एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. अनेकांनी बिग बॉस शो बॉयकॉट करण्याच्या कमेंट केल्या आहेत. या पर्वाचा महाअंतिम सोहळा येत्या ८ जानेवारीला पार पडणार आहे.