‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे. एकूण चार स्पर्धकांची घरा एन्ट्री झाली आहे. राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जग्गनाथ या सदस्यांनी घरात दमदार एन्ट्री केली. राखीला घरात पाहिल्यानंतर इतर सदस्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. तर प्रेक्षकही राखीची एन्ट्री पाहून अवाक् झाले आहेत.
राखीने घरात प्रवेश करताच दमदार डायलॉग बाजी सुरू केली. अपूर्वा नेमळेकरला ”ए शेवंते” अशी हाक मारली. ती इथवरच थांबली नाही. राखी पुढे म्हणाली, “तुम्हा सर्वांची आई आहे मी. ‘बिग बॉस’ची पहिली बायको, अंड्याची भुर्जी व राखी सावंतची मर्जी इथे चालणार.”
राखीचा हा खास अंदाज पाहून घरातील सदस्यांनाही हसू अनावर झालं. राखीने घरात म्हटलेले हे संवाद विशेष लक्षवेधी ठरत आहेत. राखीला घरात पाहून प्रेक्षकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. राखीला घरात आणलं आता मनोरंजन डबल होणार, राखीचे संवाद खूप भारी, आली रे आली राखी सावंत आली अशा अनेक कमेंट कलर्स मराठीचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी केल्या आहेत.
आणखी वाचा – “अंड्याची भुर्जी अन्…” राखी सावंतसह तीन सदस्यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दणक्यात एन्ट्री
तर काहींनी राखी घरात आल्यावर नाराजीही व्यक्त केली आहे. राखीसह इतर चार सदस्य घरात आल्यावर घरातील समीकरण बदलणार हे नक्की. पण राखी कोणत्या कोणत्या सदस्यांना आपल्या तालावर नाचावणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.