छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बिग बॉसचे चौथे पर्व चांगलेच गाजताना दिसत आहे. बिग बॉसचे चौथे पर्व सुरु झाल्यापासून त्यात नवनवे ट्विस्ट, स्पर्धकांमध्ये होणारी भांडणं, त्यांच्या खेळी पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. बिग बॉसच्या चौथ्या पर्वात आतापर्यंत दोन सदस्य घराबाहेर पडले आहेत. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. नुकतंच याचा एक प्रोमो समोर आला आहे.

बिग बॉस मराठी चौथे पर्व सध्या चांगलेच गाजताना आणि वाजताना दिसत आहे. या पर्वात अभिनेता किरण माने, अमृता धोंगडे. अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत, प्रसाद जवादे हे कलाकार सातत्याने चर्चेत आहेत. त्याबरोबरच त्रिशूल मराठे, यशश्री मसूरकर, योगेश जाधव या कलाकारांनीही बिग बॉसच्या घरात धिंगाणा घातला आहे. बिग बॉसच्या घरात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात दोन आठवड्यानंतर अभिनेता निखिल राजेशिर्केला घराबाहेर पडावे लागेल. त्यानंतर अभिनेत्री मेघा घाडगे घराबाहेर पडली. त्यानंतर आज आणखी एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. मात्र त्यातच आता एक वेगळा ट्विस्ट या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा : ‘तू कुणाची लायकी काढतोस?’ महेश मांजरेकरांनी किरण मानेंना खडसावले

In Devendra Fadnavis meeting Mukesh Shahane absconding from the police on the platform
देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत पोलिसांच्या लेखी फरार मुकेश शहाणे व्यासपीठावर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray rally in thane
ठाणे हे खोक्याचे केंद्र – उद्धव ठाकरे
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
maharashtra assembly election 2024 prakash ambedkar alleges that travel in mumbai and electricity bills is expensive because of adani
मुंबईतली प्रवास, वीज अदानींमुळे महाग, वंचित’च्या प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?

अक्षय केळकर या आठवड्याचा कॅप्टन बनल्याने पुढील आठवड्यापर्यंत तो आता सेफ झोनमध्ये असणार आहे. त्यामुळे या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोणाला घराबाहेर जावे लागणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. हा सदस्य बाहेर पडताच आज बिग बॉसच्या घरात एक वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. वाईल्ड कार्ड द्वारे एंट्री घेणाऱ्या सदस्याची पहिली झलक सर्वांसमोर आली आहे. ही सदस्य नेमकी कोण? याबद्दल अनेकजण अंदाज लावताना दिसत आहेत.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : ‘शेवंता’, किरण माने अन् ‘मिसेस मुख्यमंत्री’…, ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होणाऱ्या कलाकारांची संपूर्ण यादी

बिग बॉसच्या चौथ्या पर्वामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री करणारी पहिली सदस्य ऐश्वर्या शेट्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐश्वर्या शेट्ये ही मालिका अभिनेत्री आहे. स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेत ऐश्वर्याने सोनालीचे पात्र साकारले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच तिने या मालिकेचा निरोप घेतला होता.