यंदा बिग बॉसचे चौथे पर्व चांगलेच चर्चेत आहे. विविध कारणांमुळे चर्चेत असलेला बिग बॉस मराठी हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नुकतंच बिग बॉसच्या टॉप चार फायनलिस्टची नावे समोर आली आहेत. नुकत्याच झालेल्या भागातून ही नावे समोर आली आहेत.  

बिग बॉस मराठीचे पर्व सुरु झाल्यापासून त्यात दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि त्यांचा खेळ यावरुन हा कार्यक्रम गाजताना दिसत आहे. यंदा बिग बॉसचे पर्व ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी यंदाच्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची तारीख समोर आली होती. येत्या ८ जानेवारीला बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा पार पडणार असल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : अपूर्वा नेमळेकरचा पूर्वाश्रमीचा पती आहे शिवसेना पदाधिकारी, ‘या’ कारणामुळे झालेला दोघांचा घटस्फोट

Mahesh Manjrekar And Riteish Deshmukh
“बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या स्पर्धकांसाठी महेश सरच परफेक्ट…”, आधीच्या पर्वातील स्पर्धकाचे स्पष्ट वक्तव्य, “रितेश सर खूपच…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
indian athletes performance in paralympics 2024
अन्वयार्थ : अक्षय क्षमतांचे क्षितिज!
Paralympics 2024 Giacomo Perini updates in Marathi
Paralympics 2024 : मोबाईल बाळगणे पडले महागात! इटालियन खेळाडूला पॅरालिम्पिकमध्ये गमवावे लागले कांस्यपदक
Neeraj chopra qualified for the Diamond League Finals sport news
नीरज डायमंड लीग अंतिम फेरीसाठी पात्र
American Open Tennis Tournament rohan Bopanna Aldila Sutjiadi in semi final match sport news
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा: बोपण्णा-सुतजियादी उपांत्य फेरीत; चुरशीच्या लढतीत चौथ्या मानांकित एब्डेनक्रेजिकोवा जोडीला धक्का
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
trp marathi serial shivani surve serial grabs second place
TRPच्या शर्यतीत शिवानी सुर्वेच्या मालिकेची मोठी झेप! ‘बिग बॉस मराठी’ कितव्या स्थानावर? पाहा टॉप-१० कार्यक्रमांची यादी…

बिग बॉस मराठीचा ८४ वा दिवस पार पडला. सोमवारी बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडले. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना नॉमिनेट करायचे होते. सध्या घरात किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, आरोह वेलणकर हे सदस्य राहिले आहेत. यात आरोह वेलणकर हा घराचा कॅप्टन असल्याने त्याला नॉमिनेट करता येणार नाही, असे बिग बॉसने जाहीर केले होते. त्यामुळे  इतर सदस्यांनी प्रसाद, अमृता आणि राखी या तीन जणांना नॉमिनेट केले. त्यामुळे ते तिघेही नॉमिनेट झाले.

तर दुसरीकडे किरण माने, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, आरोह वेलणकर हे सदस्य सुरक्षित झाले. त्यामुळे ते चौघेजण बिग बॉसच्या घरातील टॉप चार फायनलिस्ट ठरले. त्यामुळे आता येत्या भागात बिग बॉस मराठीच्या घरात पुढे काय होणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

आणखी वाचा : “अस्सल दादरकर, आठ वर्षांचे रिलेशनशिप, लग्न अन्…” ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेल्या अपूर्वा नेमळेकरबद्दल माहितीये का?

तसेच यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याच्या जय्यत तयारीला देखील सुरूवात झाली आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.