‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अभिनेता अक्षय केळकर हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. तर अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. बिग बॉसच्या घरात असताना अनेक अनपेक्षित गोष्टी समोर आल्या. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री राखी सावंतची वाईल्ड कार्ड एंट्री. नुकतंच बिग बॉस फेम अभिनेता विकास पाटीलने राखी सावंतसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकास पाटील हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्याने राखी सावंतबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने तिचे कौतुक केले आहे.

विकास पाटीलची इन्स्टाग्राम पोस्ट

“आयुष्यात प्रत्येकवेळेस मनाचीच हाक न ऎकता कधीतरी बुद्धीच्या आवाजाला पण ओ द्यावी …कित्येकदा तो आवाज तुम्हाला अनपेक्षित गोष्टी देऊन जातो. तू तेच केलंस आणि 9 लाख पदरात पाडून घेतलेस. राखी सावंत फारच योग्य निर्णय, तू खरी एंटरटेनर आहेस आणि चांगली खेळाडूदेखील.

विजेता होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी ट्रॉफी हातात असण्याची गरज नाही. तुला जीवनात सर्व यश आणि चांगल्या गोष्टी मिळू दे. तुमच्या आईला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. ती लवकरच तंदुरुस्त आणि निरोगी होईल… गणपती बाप्पा मोरया”, असे विकास पाटीलने म्हटले आहे.

दरम्यान तब्बल १०० दिवसांचा खेळ पूर्ण केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले. यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे या स्पर्धकांचा समावेश होता. यात राखी सावंत हिने बझर राऊंड या टास्कमध्ये बझर वाजवत बाहेर पडली. या टास्कदरम्यान स्पर्धकांपुढे एक पर्याय ठेवण्यात आला होता. या पर्यायामध्ये विजेत्या स्पर्धकाला मोठी रक्कम मिळणार आहे.

मात्र इतर स्पर्धकांना बक्षीस मिळणार नाही म्हणून हा बझर राउंड ठेवण्यात आला, ज्यात स्पर्धक ९ लाख रुपये घेऊन घराच्या बाहेर पडू शकतात. त्यात सुरवातीला ५ लाख इतकी रक्कम होती नंतर ती वाढवण्यात आली. यावेळी शेवटच्या क्षणी राखी सावंतने हा पर्याय निवडला. त्यानंतर ती घराबाहेर पडली आहे. यामुळे बिग बॉसच्या घरात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, किरण माने आणि अमृता धोंगडे हे चार सदस्य राहिले. या टास्कनंतर पुन्हा एकदा एलिमेनेशन टास्क पार पडला. त्यात अक्षय केळकर आणि किरण माने बाहेर पडले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 vikas patil share special post for wild card entry rakhi sawant took exit nrp
Show comments