कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये एक नवा ट्विस्ट येणार आहे. घरामध्ये चार वाईल्ट कार्ड एन्ट्री होणार आहेत. आजच्या भागामध्ये घरातील कोणता सदस्य बाहेर जाणार आणि घरात येणार ते चार स्पर्धक कोण असणार? याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचपूर्वी घरात असलेल्या सदस्यांचे खरे चेहरे आता समोर येऊ लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : किरण माने घरातून बाहेर पडताच विकास सावंत बदलला? अपूर्वा नेमळेकरशी मैत्री अन्…; प्रेक्षकही संतापले

किरण माने यांना ‘बिग बॉस’ने विशेष अधिकार देत सिक्रेट रूममध्ये ठेवलं होतं. किरण घराबाहेर पडताच त्यांचा जवळचा मित्र विकास सावंतने अपूर्वा नेमळेकरशी मैत्री केली. विकास व अपूर्वाच्या मैत्रीची सर्वत्र चर्चाही रंगली. पण किरण घरामध्ये येताच विकास पुन्हा बदलला असल्याचं पाहायला मिळत आहे.

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विकास अपूर्वाबाबत बोलताना दिसत आहे. “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे” हा टास्क घरातील सदस्यांना देण्यात आला. यामध्ये प्रत्येकाने एका स्पर्धकाचा फोटो कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचा असा हा टास्क आहे.

आणखी वाचा – “…त्यामुळेच मिळाली एका राजाला राणी” मेघा घाडगेचा नववधूच्या लूकमधील फोटो व्हायरल, चाहते करताहेत अभिनंदन

विकास चक्क यावेळी अपूर्वाचं नाव घेतो, म्हणतो, “माझ्यासाठी कचऱ्याच्या डब्ब्यामध्ये टाकण्यास एकच नाव आहे ते म्हणजे अपूर्वा नेमळेकर.” यावेळी अपूर्वा त्याच्याकडे रागाने पाहते. तर किरण मानेही विकासचं नाव घेत म्हणतात, “सगळ्यांना जो विकास आवडत आहे त्याचं नंतर नंतर ओझं होत गेलं.” आता या खेळालं नवं कोणतं वळण मिळणार? हे पाहणं रंजक ठरेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 vikas sawant apurva nemlekar friendship break video goes viral on social media kmd