‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे काहीच आठवडे शिल्लक आहेत. लवकरच या पर्वातील टॉप पाच फायनलिस्ट मिळणार आहेत. गेल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’मध्ये डबल एलिमिनेशन पार पडले. यामध्ये अमृता देशमुख व विकास सावंत हे दोन सदस्या घरातून बाहेर पडले.
विकास सावंत व किरण मानेंमध्ये सुरुवातीपासूनच घरात घट्ट मैत्री झाली होती. त्यांच्यात अधूनमधून खटकेही उडालेले पाहायला मिळायचे. परंतु, तरीही त्यांचा घरात एकत्र वावर असायचा. विकासने ‘बिग बॉस’च्या घरातून एग्झिट घेतल्यानंतर किरण माने भावूक झालेले दिसले.
हेही वाचा>> Bigg Boss Marathi: विकास सावंत घराबाहेर पडताच ढसाढसा रडले किरण माने; भावूक होत म्हणाले “ईक्या लेका…”
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विकासने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. विकासने घरातील अनेक गोष्टी व सदस्यांबाबत या मुलाखतीत उलगडा केला. “‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाचा विजेता कोण ठरणार?”, असा प्रश्न विकासला विचारण्यात आला. यावर उत्तर देत विकास म्हणाला, “बिग बॉसची ट्रॉफी किरण दादाच घरी घेऊन जाणार. मला खात्री आहे. दाद्याचा खेळ उत्तम आहे आणि त्यानेच हा शो जिंकावा, अशी माझी इच्छा आहे”.
हेही वाचा>> फिफा वर्ल्ड कपवर अर्जेंटिनाने नाव कोरल्यानंतर गौरव मोरेने शेअर केला लिओनेल मेस्सीचा फोटो, म्हणाला…
विकास सावंत व अमृता देशमुख घरातून बाहेर पडल्यानंतर आता घरात केवळ सात सदस्य राहिले आहेत. खेळात शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांना नवे डावपेच आखावे लागणार आहेत. त्यामुळे शेवटचे काहीच आठवडे शिल्लक राहिलेले असताना आता खेळ अधिक रंजक होणार आहे.