‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अतिशय वादग्रस्त असलेला हा शो तितक्याच आवडीने प्रेक्षक पाहतात. यंदाच्या पर्वात स्पर्धकांमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात या आठवड्यात कॉलेज स्पेशल थीम असून यावर आधारित टास्क खेळताना स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत होताना दिसणार आहे.
यंदाच्या आठवड्याची कॉलेज स्पेशल थीम असल्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींत रममाण झाले. यावेळी विकास सावंतनेही त्याच्या शालेय जीवनातील एक प्रसंग सांगितला. विकासला त्याच्या उंचीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला असल्याचंही तो शोमध्ये सांगताना दिसतो. अनेकदा लोकही त्याला त्याच्या उंचीमुळे हिणवत असल्याचं विकासने सांगितलं होतं. असंच एका मुलीनेही त्याला उंचीमुळे नकार दिला होता. हा प्रसंग विकासने ‘बिग बॉस’च्या घरात सांगितला.
हेही वाचा >> अनुराग कश्यप साकारणार विजय मल्याची भूमिका?, ‘फाइल नं ३२३’ चित्रपटामुळे चर्चेला उधाण
हेही वाचा >> “ऐतिहासिक संदर्भांचे पुरावे सेन्सॉर बोर्डकडे…”, ‘हर हर महादेव’ वादावर दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंची स्पष्ट भूमिका
विकास म्हणाला, “मी सातवीत असताना एका मुलीवर खूप प्रेम करायचो. मला ती खूप आवडायची. एक दिवस माझ्या मनातील भावना तिला सांगायचं मी ठरवलं आणि तिला प्रपोज केलं. तू मला खूप आवडतेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो, असं मी तिला म्हणालो. त्यावर ती मला तुझी उंची बघ, असं म्हणाली. मला तेव्हा खूप वाईट वाटलं. देवाने मला असं बनवलं यात माझी काय चूक आहे, असं मला वाटलं”.
हेही वाचा >> “अपूर्वा नेमळेकर घरात फक्त अभिनय…”, ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या योगेश जाधवचा खुलासा
पुढे विकासने सांगितलं “त्यानंतर २०१३ला माझा शो आला होता. तो शो पाहून त्या मुलीने मला कॉल केला. तिने माझी विचारपूस केली. मला लग्न केलंस का असं विचारलं. त्यावर मी नाही असं उत्तर दिलं. तेव्हा मला एक गोष्ट समजली, तुम्ही फेमस असाल तरच लोक तुम्हाला विचारतात”. विकास टास्कमध्येही अत्यंत हुशारीने खेळ खेळताना दिसतो.