छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. यंदा बिग बॉस मराठीची रंगत दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरु असलेल्या बिग बॉसमध्ये अनेक राडे, भांडण, स्पर्धकांमध्ये सतत होणारे वाद पाहायला मिळत असतात. नुकतंच बिग बॉसच्या घरातील दुसरे एलिमेशन पार पडले. बिग बॉसच्या घरातून मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगे हिला बाहेर पडावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. आरोप प्रत्यारोप तर बघायला मिळालेच पण, काही सदस्यांना आता जागं होण्याची गरज आहे असे देखील महेश मांजरेकरांनी सांगितले. या आठवड्याच्या चावडीत महेश मांजरेकरांनी योगेशला सक्त ताकीद मिळाली जर या पुढे कोणाचा बाप काढला तर घरामधून बाहेर काढेन. तर काही सदस्यांना पत्राद्वारे आपल्या व्यक्त करण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. तेजस्विनीने अमृता धोंगडेसाठी तर प्रसादने योगेशसाठी पात्र लिहिले… तर अमृता देशमुखने प्रसादसाठी पत्र लिहिले तर किरण माने यांनी विकाससाठी.
आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील पहिली विकेट, निखिल राजेशिर्केची घरातून एक्झिट

याबरोबरच बिग बॉसच्या चावडीतील चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे अपूर्वा नेमळेकर ही अमृता धोंगडेवर चांगलीच भडकली, “आयुष्यात पुन्हा असं बोलीस तर खूप महागात पडेल” असे अपूर्वाने तिला बजावून सांगितले.

आणखी वाचा : “खोट्या माणसांना तिथून काढण्याची…” ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर निखिल राजेशिर्केचा संताप

त्याबरोबरच दिवाळीनिमित्त काही स्पेशल भेटवस्तू सदस्यांनी एकमेकांना दिल्या. ज्यामध्ये त्रिशूलने योगेशला नारळ देऊन बाहेरचा रस्ता दाखवला, तर अपूर्वाला काडेपेटी मिळाली. तर तेजस्विनीला रिमोट कंट्रोल मिळाले. यानंतर बिग बॉसमधील घरातून एक सदस्य बाहेर पडण्याची वेळ आली.

बिग बॉसच्या घरातून मेघा घाडगे यांना घराबाहेर पडावे लागले. यावेळी मेघा घाडगे यांच्या एलिमेशननंतर अपूर्वा नेमळेकर फार भावूक झाली. तर मेघा घाडगेने जाता जाता अनेकांवर खोचक टीकाही केली. अमृता देशमुख धन्यवाद मला चूक नसताना नॉमिनेट केलं, असे ती म्हणाली. तर किरण माने तुमच्यामुळे मी बाहेर आले आहे. मी एक एव्ही पहिली, या माणसापासून सांभाळून राहा” असा सल्ला मेघा घाडगे यांनी घरच्यांना दिला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 weekend chi chavadi megha ghadge evicted from the show nrp