छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. यंदा बिग बॉस मराठीची रंगत दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. २ ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या बिग बॉसमध्ये अनेक राडे, भांडण, स्पर्धकांमध्ये सतत होणारे वाद पाहायला मिळत आहेत. नुकतंच बिग बॉसच्या घरातील तिसरे एलिमेशन पार पडले. निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे यांच्यापाठोपाठ बिग बॉसच्या घरातून जेंटल जाईंट अशी ओळख असलेल्या योगेश जाधवला घराबाहेर पडावे लागले.

यंदाच्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी किरण माने यांची चांगलीच कानउघडणी केली. महेश मांजरेकरांनी चावडीवर बऱ्याच सदस्यांची शाळा घेतली? कोण कुठे चुकले? कोण बरोबर खेळले. या सगळ्याचा हिशोब घेतला. सदस्यांच्या वर्तणुकीसाठी त्यांनी स्पर्धकांना चांगलंच सुनावले. पण यावेळेस महेश मांजरेकरांचा ओरडा नक्की कोणत्या सदस्याला मिळेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. किरण माने यांच्या बऱ्याच गैरसमजुती महेश मांजरेकरांनी दूर केल्या. तसेच विकासाला त्याचे खेळू दे असा सल्ला देखील दिला.
आणखी वाचा : “ताई पैसे देतो, नाचून दाखवा…” ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच मेघा घाडगेचा योगेशवर गंभीर आरोप

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Sayed Azeempeer Khadri
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारण्यास तयार होते’, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या विधानामुळं खळबळ
Bunty Shelke arrived with a fogging machine due to the increase in mosquitoes nagpur news
नागपुरात डासांचा उद्रेक…अन् काँग्रेस उमेदवार प्रचार सोडून फाॅगिंग…
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

‘मी सगळं बघतोय. इथे सगळेच खेळायला आलेत. तिथे कुणाचं वैयक्तिक भांडण नाहीये. मी काय त्यांच्यावर रोल फेकतो. तू कुणाची लायकी काढतोस? तू स्वतः काय आहेस? मी बॅग घेऊन घराबाहेर काढेन तुला’. या शब्दात महेश मांजरेकरांनी किरण मानेंना खडसावून सांगितले. त्याचबरोबर बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे अक्षय आणि अपूर्वा किरण मानेंवर भडकले. तर अमृता देशमुखने देखील किरण मानेंनी केलेल्या वक्त्यावर नाराजी दर्शवली.

यानंतर बिग बॉसमधील घरातून एक सदस्य बाहेर पडण्याची वेळ आली. बिग बॉसच्या घरातील विकास आणि योगेश डेंजर झोनमध्ये होते. त्यातून योगेश जाधवला बिग बॉसचे घर सोडावे लागले. बिग बॉसने त्याच्या नावाची घोषणा केल्यानंतर तो भावूक झाला. तसेच घरातील अनेक सदस्यही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महेश मांजरेकरांनी त्याच्या खेळात कुठे चुकले, तो कुठे बरोबर होता, याबद्दल त्याला सांगितले.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाचे नाव समोर, ऐतिहासिक भूमिकांसह बोल्ड फोटोमुळे चर्चेत

दरम्यान मागच्या आठवड्यात त्याच्यावर मेघा घाडगेने घराबाहेर पडताच आरोप केले होते. “योगेशचा पहिल्या दिवसापासून त्याच्या तोंडावर अजिबात ताबा नाही. मी त्याला वेळोवेळी सावध केलं आहे. तू जे बोलतोस ते सगळंच मी ऐकून घेऊ शकत नाही. तू थोडं तोंड साभाळून बोलत जा. कारण तू जे बोलतोस ते मनाला लागतं. हे मी त्याला बिग बॉसच्या घरात म्हटले, असे मेघा घाडगेने सांगितले होते. तसेच या आठवड्यात देखील त्याने इतर स्पर्धकांशी पंगा घेतला. योगेशने मेघा घाडगेबरोबरच इतर स्पर्धकांना असभ्य भाषेत भांडण केले होते. हेच त्याला भोवले असल्याची शक्यता चाहत्यांकडून वर्तवली जात आहे.