‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी नावावर करत अक्षय केळकर चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. अक्षय पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता. उत्तम खेळीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. बिग बॉसची ट्रॉफी हातात घेतल्यानंतर अक्षय व त्याच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर अक्षयने इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. अक्षयने अनेकदा त्याची गर्लफ्रेंड रमाबाबत ‘बिग बॉस’च्या घरात खुलेपणाने बोलताना दिसला होता. “बिग बॉसची ट्रॉफी हातात आल्यानंतर गर्लफ्रेंडची काय प्रतिक्रिया होती?”, असा प्रश्न अक्षयला विचारण्यात आला. अक्षयनेही या प्रश्नावर अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं.
हेही वाचा>> नवीन गाण्यामुळे ट्रोल झाल्यानंतर अमृता फडणवीसांनी बनवला रील व्हिडीओ, डान्सही केला, म्हणाल्या…
“माझी गर्लफ्रेंड रमा आता माझ्या समोर बसली आहे. ‘बिग बॉस’ची ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सगळ्यांप्रमाणेच तिलाही आनंद झाला. माझ्या हातात ट्रॉफी बघून रमाही खूश होती”, असं अक्षय म्हणाला. अक्षय व त्याची गर्लफ्रेंड रमा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अक्षयने बिग बॉसच्या घरात याबाबत खुलासा केला होता.
हेही वाचा>> ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हुकल्यानंतर अमृता धोंगडेची पोस्ट, म्हणाली “आता प्रत्यक्षात…”
हेही वाचा>> मिठी मारली, किस केलं अन्…; अनुपमा-अनुजचा इंटिमेट होतानाचा व्हिडीओ व्हायरल
अक्षयने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातही त्याने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं.