‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा अखेर रविवारी (८ जानेवारी) पार पडला. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. अभिनेता अक्षय केळकरने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या विजेतपदाचा मान पटकावला. तर अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नुकतंच अक्षय केळकरने बिग बॉसची ट्रॉफी मिळाल्यानंतर त्याला काय वाटतं? याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षय केळकर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर आता अनेक चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहे. बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर अक्षय केळकरच्या नावाचा ट्रेंडही सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. तसेच त्याच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला. यानंतर आता अक्षय केळकरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Jitendra Awhad
Jitendra Awhad : “ताजमधले केक अन् चांगली कॉफी…” विधानसभेच्या अध्यक्षांचे अभिनंदन करताना आव्हाडांची खास मागणी चर्चेत

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’ चौथ्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा, अक्षय केळकरने कोरले ट्रॉफीवर नाव

अक्षय केळकरची पहिली प्रतिक्रिया

“नमस्कार मी अक्षय केळकर, आज फक्त अन् फक्त तुमच्यामुळे मी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरलोय. मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. त्याबरोबर मी माझे लक्ष्यदेखील पूर्ण केले. त्याबद्दल मी प्रेक्षकांचे, कलर्स मराठीचे, महेश मांजरेकर, घरातील सर्व सदस्यांचे, बिग बॉसच्या बॅकस्टेज टीमचे सर्वांचेच आभार. आय लव्ह यू, मी फक्त तुमचाच आहे. फार मजा आली. कमाल गेम आणि आई-पप्पा धन्यवाद”, असे अक्षय केळकरने म्हटले.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : अक्षय केळकर ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर अपूर्वा नेमळेकरची पहिली पोस्ट, म्हणाली…

दरम्यान यंदा बिग बॉसमध्ये अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे स्पर्धक टॉप ५ स्पर्धक ठरले. यावेळी राखी सावंत ही ९ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यापाठोपाठ अमृता धोंगडेंनीही एक्झिट घेतली. त्यामुळे घरात फक्त अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक होते. यानंतर किरण माने हे घराबाहेर पडले. त्यामुळे बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे टॉप २ सदस्य हे अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर ठरले.

आता या दोघांमध्ये अक्षय केळकर हा चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले.

Story img Loader