‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे काहीच आठवडे शिल्लक आहेत. लवकरच या पर्वाचा विजेता घोषित केला जाणार आहे. ८९ दिवस उलटल्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात शेवटचे कॅप्टन्सी कार्य पार पडले. परंतु, या टास्कमधील ट्विस्टने सदस्यांना आश्चर्याचा धक्का बिग बॉसने दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या शेवटच्या कॅप्टन्सी पदाचा बहुमान मिळवण्यासाठी सदस्यांना बक्षीसाच्या रकमेवर पाणी सोडावे लागणार होते. ‘बिग बॉसच्या मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या विजेत्याला ट्रॉफी व २५ लाख रुपये रक्कम मिळणार होते. परंतु, कॅप्टन्सी टास्कदरम्यान ही रक्कम अर्ध्याहून कमी झाली आहे. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याच्या नावाची पाटी त्याच्या गळ्यात अडकवण्यात आली होती. दर दहा सेकंदाला बक्षिसाच्या रकमेतून ५० हजार कमी होणार होते.

हेही वाचा>>“…म्हणून मी त्यांना चित्रपटात घेतो”, रोहित शेट्टीचं मराठी कलाकारांबाबत मोठं वक्तव्य

कॅप्टन की बक्षिसाची रक्कम यातील एक पर्याय सदस्यांना निवडायचा होता. सदस्यांनी बझर वाजवून कॅप्टनी कार्यातून बाद होत बक्षिसाची रक्कम कायम ठेवायची होती. टास्क सुरू झाल्यानंतर २० सेकंदांनी २४ लाख रक्कम वाचवत अक्षय केळकरने कॅप्टन्सी कार्यातून माघार घेत त्याच्या नावाची पाटी एटीएम मशिनमध्ये टाकली. त्यानंतर पुढच्या १० सेकंदात किरण माने व अपूर्वा नेमळेकर कॅप्टन्सी कार्यातून बाहेर पडले.

हेही वाचा>> “छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना रायगडावरुन ऑर्डर…”, शरद पोंक्षेंनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

हेही वाचा>> लग्नाआधीच गरोदर असण्याच्या चर्चांवर देवोलिना भट्टाचार्जीने सोडलं मौन, म्हणाली…

आरोह वेलणकर व प्रसाद जवादे यांच्यात टास्कमध्ये माघार घेण्यावर वाद झाले. बक्षिसाची रक्कम आठ लाखावर आल्यानंतर प्रसाद कॅप्टन्सी कार्यातून बाहेर पडला. त्यानंतर १० सेकंदात अमृता धोंगडेनेही तिच्या नावाची पाटी एटीएम मशीनमध्ये टाकली. कॅप्टन्सी कार्यात आरोह वेलणकर विजयी ठरल्यामुळे तो घरातील शेवटचा कॅप्टन ठरला आहे. परंतु, आता ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाच्या विजेत्याला ट्रॉफी व केवळ आठ लाख रुपये मिळणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 winner to get 8 lakhs contestant lost 17 lakhs in captaincy task kak