Bigg Boss Marathi 5 चे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सदस्यांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन वाद सुरू असतात. आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीने बिग बॉसचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये आर्या, निक्की आणि जान्हवी भांडताना दिसत आहेत.

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
Torres Scam
Torres Scam : टोरेस कंपनीचा सीईओ दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे; पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघड!
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?

प्रोमोच्या सुरुवातीला, जान्हवी आर्याला म्हणते, बिग बॉस मी स्वत:ला नाही सांभाळू शकत. त्यानंतर निक्की आर्याला म्हणते, “माझ्या पांघरुणाला हात लावायचा नाही, समजलं ना?” त्यानंतर आर्या-निक्की, आर्या-जान्हवी यांच्यामध्ये भांडण पाहायला मिळते. जान्हवी म्हणते, “ताई हिला समजावून सांगा.” त्यानंतर जान्हवी निक्कीला अडवत असल्याचे पाहायला मिळते. आता या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कंमेट करत आर्याला पाठिंबा दिला आहे. हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठीने, आर्या, निक्की आणि जान्हवीत झालाय कल्ला, कोणी समजावू शकणार आहे का त्यांना? असे कॅप्शन दिले आहे.

काय म्हणाले नेटकरी?

आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कंमेट करत आर्याला पाठिंबा दिला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “आर्या तू नड, बाकी आम्ही आहेच.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “जान्हवी आणि निक्कीला बाहेर काढलं तर माझा पाठिंबा आर्याला आहे.” आणखी एक नेटकरी म्हणतो, “शाब्बास आर्या, थेट भीड तू त्या दोघींना, आम्ही तुझ्यासोबत आहोत. एक नेटकरी म्हणतो, “आर्या एक नंबर, यांना यांच्या भाषेतच उत्तर दिले पाहिजे.” असे म्हणत नेटकऱ्यांनी आर्याचे कौतुक करत तिला पाठिंबा दिला आहे.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये मोठी भांडणे होताना दिसत आहेत. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने केलेल्या कानउघडणीनंतरदेखील जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळेला जोकर म्हटले होते. तिच्या या विधानानंतर सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी पंढरीनाथ कांबळेची बाजू घेत जान्हवी किल्लेकरवर टीका केली होती. जान्हवीने आपल्या विधानाबद्दल पंढरीनाथ कांबळेची माफी मागितल्याचेदेखील पाहायला मिळाले. मात्र तिने ज्या पद्धतीने माफी मागितली, ती खोटी असल्याचे अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

हेही वाचा: ‘स्त्री २’ च्या यशानंतर श्रद्धा कपूरची ‘क्रिश ४’मध्ये वर्णी? महत्त्वाची माहिती आली समोर

आता घरात नॉमिनेशन टास्क पार पडणार असून कोणता सदस्य कोणत्या सदस्याला नॉमिनेट करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तिसऱ्या आठवड्यात योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे दोन सदस्य घराबाहेर पडले आहेत. याबरोबरच, या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर कोणत्या सदस्याला रितेश देशमुखकडून शाबासकी मिळणार आणि कोणत्या सदस्याला आरसा दाखवला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader