Aarya Jadhao First Post After Elimination : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 5) पाचव्या पर्वातील हा आठवडा खूपच गाजला. कॅप्टन्सी टास्कदरम्यान आर्या व निक्की यांच्यातील झटापट झाली आणि आर्याने निक्कीला कानाखाली मारली. यानंतर आर्याला जेलमध्ये टाकलं होतं. तसेच आज भाऊच्या धक्क्यावर निर्णय होईल, असं बिग बॉसने सांगितलं होतं. त्यानंतर आज रितेशने घटनाक्रम सांगितल्यानंतर बिग बॉसने आर्याला घरातून निष्कासित केलं. घरातून बाहेर पडल्यावर आर्या जाधवने पहिली पोस्ट केली आहे.

आर्याने निक्कीला मारल्यानंतर सोशल मीडियावर काही जण आर्याला तर काही निक्कीला पाठिंबा देत होते. एक दिवस जेलमध्ये ठेवल्यावर बिग बॉसमधून आर्याला निष्कासित करण्यात आलं.

What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”
Former Chief Minister Prithviraj Chavan regrets the misinformation spread about Dr Manmohan Singh
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत अपप्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंत
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”
Dhananjay Munde News
Dhananjay Munde : धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित, विचारताच म्हणाले; “मी राजीनामा….”

रितेश देशमुखने सांगितला घटनाक्रम

रितेश देशमुख म्हणाला, “निक्कीने जे तुमच्याबरोबर केलं, ते आधी पॅडी आणि अंकिताबरोबर केलं. पण त्यांनी परिस्थिती नीट हाताळली. मग निक्कीला वाटलं की आपण इथे काहीच करू शकत नाही, त्या तिथून निघून गेल्या. त्या तुमच्याकडे आल्यावर तुम्ही फिजीकल झालात. जेव्हा बाथरुममध्ये निक्की आल्या, तुम्हाला त्यांना आत येऊ द्यायचं नव्हतं, या धक्काबुक्कीत तुम्हाला निक्कीचा हात लागला. त्यानंतर तुमचा संयम सुटला आणि तुम्ही काय म्हणालात, “निक्की मी तुला मारेन” आणि त्यानंतर तुम्ही निक्कीवर हात उचलला. आर्या तुम्ही स्वतःला काय समजता? म्हणजे तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलणार? स्वतःवर नियंत्रण नाही? हे बिग बॉसचं घर आहे. या घरात खेचाखेची, धक्काबुक्की सगळ्या सिच्युएशन आल्यात, पण कोणीही स्वतःवरचा ताबा सोडला नाही. कोणीही कोणावर हात उचलला नाही. तुम्ही जे केलं ते जाणीवपूर्वक केलंत, मी बिग बॉसना सांगतो की त्यांनी आपला निर्णय सांगावा.” रितेशने हे सांगितल्यावर बिग बॉसने आर्याला घरातून निष्कासित केलं.

निक्कीला मारणं पडलं महागात, रितेशने सुनावलं अन् आर्याला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, “अशा निंदनीय कृत्यांना…”

आर्याची पहिली पोस्ट

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आर्या जाधवने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली आहे. तिने लाल रंगाचा ब्रोकन हार्ट इमोजी वापरला आहे.

आर्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

‘आर्याने निक्कीला मारून पूर्ण महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलेली आहे. आर्या तू इतर स्पर्धकांपेक्षा तू वयाने कमी असूनसुद्धा खूप चांगलं खेळलीस, तुझ्याबद्दल आमच्या मनात खूप आदर आहे,’ अशी कमेंट एका युजरने केली. तर दुसरा युजर म्हणाला, ‘अरे वाघीण येतीये, निक्कीला तिची लायकी दाखून आली आपली राणी आर्या.’ ‘आज पासून बिग बॉस बघणं बंद… बॉयकॉट बिग बॉस’, ‘आजचा आर्यासाठी बिगबॉसने घेतलेला निर्णय पूर्ण चुकीचा आहे..’ अशा कमेंट्स आर्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

netizens comments on aarya jadhao first post after Elimination
आर्या जाधवच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)
netizens comments on aarya jadhao first post after Elimination (1)
आर्या जाधवच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, आर्याने निक्कीला मारलं ते ऑनएअर का दाखवण्यात आलं नाही, याचं कारण भाऊचा धक्क्यावर रितेशने सांगितलं. प्राइम टाइम शो आहे आणि हा शो मुलंही बघतात, त्यामुळे हिंसा दाखवू शकत नाही, असं होस्ट रितेश देशमुख म्हणाला.

Story img Loader