Aarya Jadhao Amaravati Visit Details: बिग बॉस मराठीतून (Bigg Boss Marathi 5) लोकप्रिय रॅपर आर्या जाधवला निष्कासित करण्यात आलं. आर्याने स्पर्धक निक्की तांबोळीला कानशिलात मारली होती, त्यानंतर बिग बॉसने आर्याला शिक्षा दिली आणि घरातून बाहेर काढलं. घरातून बाहेर आल्यानंतर आज तिने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन चाहते व प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी तिने ती अमरावतीला कधी येणार याची माहिती दिली.
बिग बॉस मराठीत सातव्या पर्वातील कॅप्टन्सीसाठी टास्क ठेवण्यात आला होता. या टास्कमध्ये निक्की व आर्या एकमेकींच्या विरोधात खेळत होत्या. याच टास्कमध्ये आर्या व निक्की यांच्या झटापट झाली आणि त्यानंतर आर्याने निक्कीला मारलं. आर्याने निक्कीला मारल्यावर तिला बिग बॉसने जेलमध्ये ठेवलं होतं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाऊच्या धक्क्यात या विषयावर चर्चा झाली. होस्ट रितेश देखमुखने झालेला घटनाक्रम सांगितला आणि या प्रकरणात आर्याने बिग बॉसच्या घरातील महत्त्वाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे टीमला आढळले, त्यानंतर त्यांनी आर्याला घरातून निष्कासित केलं.
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
बिग बॉसच्या घरातून निष्कासित केल्यावर आर्याने आज इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी तिने घरात घडलेला प्रकार सांगितला आणि त्यावर तिचं मत मांडलं. तिने चाहत्यांना प्रश्नांची उत्तरंही दिली. यावेळी ती अमरावतीला कधी जाणार याची माहिती तिने दिली. आर्या जाधव १७ सप्टेंबरला अमरावतीला जाणार आहे. मुंबईतील चाहत्यांनी तिला विचारलं असता मुंबईतील इव्हेंटबद्दल लवकरच ठरवणार असं तिने सांगितलं.

पुन्हा Bigg Boss Marathi मध्ये जाणार का? आर्या मोजक्याच शब्दांत उत्तर देत म्हणाली…
आर्याने अमरावतीला १७ तारखेला येणार असल्याची माहिती दिली आहे, पण त्याबद्दल जास्त तपशील शेअर केलेले नाहीत. दरम्यान, या आठवड्यात आर्या निष्कासित झाल्यावर रविवारी प्रेक्षकांची कमी मतं मिळाल्याने वैभव चव्हाण घराबाहेर पडला.