Bigg Boss Marathi 5 वे पर्व जितके स्पर्धकांचे वाद, भांडणे यामुळे चर्चेत आहे, तितकेच त्या घरात घडणाऱ्या गमती-जमतींमुळेदेखील चर्चेत आहे. अनेक वेळा सूरज आणि पंढरीनाथ यांचे व्हिडीओ चर्चेत असतात. आता भाऊच्या धक्क्यावर एका टास्कमध्ये हटके अंदाजात अभिजीतने अंकिताचे कौतुक केले आहे.

भाऊच्या धक्क्यावरील व्हिडीओ टीआरपी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, घरातील सदस्यांना एक टास्क दिला आहे. काही जोड्यांची नावे घेतली जातील. ज्या जोडीचे नाव घेतले जाईल, त्या जोडीने पुढे जायचे आहे. त्यातील एका व्यक्तीने गोल फिरत असलेल्या चक्रावर उभे राहून टास्कमधील जोडीदाराचे कौतुक करायचे आहे. आता या टास्कमध्ये अंकिता आणि अभिजीत यांची जोडी आहे. अभिजीतने अनोख्या अंदाजात अंकिताचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
pune session court latest marathi news
योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या एकाचा जामीन फेटाळला, महिला पोलिसाला शिवीगाळ
Bibvewadi school girl murder, girl murder,
एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू शाळकरी मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला फिर्यादीने ओळखले, न्यायालयीन सुनावणीत फिर्यादीची साक्ष
Two arrested for attacking Chandrakant Tingre Pune print news
चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक; शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ला केल्याची कबुली
इन्स्टाग्राम

काय म्हणाला अभिजीत?

अभिजीत गोल फिरणाऱ्या चक्रावर उभा राहिला असून, तो म्हणतो, “अंकिता एक मजबूत व्यक्तिमत्त्व आहे. ती स्वत:च्या मुद्द्यांवर ठाम राहते. तिला तिचं मत चांगल्या पद्धतीनं मांडता येतं. ती सुंदर दिसणारी आणि हडकुळी, खूपच प्रेमळ अशी मुलगी आमच्यासमोर उभी आहे. असं मजबूत व्यक्तिमत्त्व, ज्याच्यामध्ये अजिबात ताकद नाहीए आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना घाबरवते. ती हापूस आंबा चांगल्या पद्धतीनं ओळखू शकते. आंबा किडलेला असेल, तर तिला कान लावून कळतं. या तिच्या खास गुणांसाठी मी तिला १०० मार्क देईन. असंच चांगलं काहीतरी करीत राहा,असे माझे आशीर्वाद आहेत.” अभिजीतच्या बोलण्यावर अंकिता, रितेश देशमुखसह सर्व स्पर्धक हसताना दिसत आहेत.

हेही वाचा: Video: संग्राम चौगुले ठरला ‘फुसका बॉम्ब’, घरातील सदस्यांनी अरबाजला दिलं बहुमत, रितेश देशमुख म्हणाला…

तर भाऊच्या धक्क्यावर आणखी टास्क होणार आहे. नाच-गाण्याचा कल्ला, असे या टास्कचे नाव आहे. टेबलावर ठेवलेल्या वस्तूंचा वापर करीत स्पर्धकांना डान्स करायचा आहे. या टास्कमध्ये वर्षा उसगांवकर आणि धनंजय पोवारची जोडी आहे. धनंजय पोवार गिटार निवडतो, तर वर्षा उसगावंकर झाडू निवडतात. ‘अश्विनी ये ना…’ या गाण्यावर ते भन्नाट डान्स करत आहेत. डान्स करताना वर्षाताई धनंजयला झाडूने मारताना दिसत आहेत. त्यांचा हा धमाल डान्स सगळे मजा घेऊन पाहत असल्याचे दिसत आहे.

इन्स्टाग्राम

आता बिग बॉस मराठीच्या घरात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader