Bigg Boss Marathi 5 वे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पहिल्या दिवसापासून या शोची चर्चा रंगलेली पाहायला मिळते. या पर्वाची चर्चा होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे गेल्या चार पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. मात्र, या पाचव्या पर्वाचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करीत असल्यानेदेखील मोठी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. आता एका अभिनेत्याने मुलाखतीदरम्यान रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनावर वक्तव्य केले आहे.

रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनाबाबत अभिनेत्याचे वक्तव्य

अभिनेता सुशील इनामदारने ‘अल्ट्रा मराठी बझ’ला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्याने बिग बॉसच्या घरातील सदस्यांवर भाष्य केले. त्याबरोबरच रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनावरदेखील वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, “रितेशचा एक क्लास आहे, एक दर्जा आहे. त्या पद्धतीने तो सदस्यांची शाळा घेतो. त्याची म्हणून एक वागण्याची पद्धत आहे. ती सांभाळून तो बोलतोय. मला माहितेय की, त्याला खूप राग येत असेल पण, त्याला तो उघडपणे व्यक्त करता येत नसेल. मला असं वाटतंय की, महेशसर असते, तर यांची अजून वेगळी शाळा झाली असती; पण तरीही रितेश ज्या पद्धतीने घरातील सदस्यांशी बोलतोय, त्यांचा कान पिळतोय, ते मला भयंकर आवडत आहे”, असे सुशील इनामदारने म्हटले आहे.

Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”
Vijay Wadettiwar
“जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
What Suresh Dhas Said About Walmik Karad?
Suresh Dhas : “संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना मोक्का लावा, यांचा ‘तेरे नाम’ मधला सलमान…”; सुरेश धस यांची टीका
Suresh Dhas Statement About Pankaja Munde and Dhananjay Munde
Suresh Dhas : “लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच झाला, कारण..”; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट

जेव्हा रितेश देशमुख बिग बॉसच्या या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असल्याचे समोर आले होते, त्यावेळी महेश मांजेरकर यांची जागा रितेश देशमुख घेऊ शकेल का? बिग बॉससारखा शो त्यांच्याइतक्याच उत्तम पद्धतीने रितेश चालवू शकणार का? तो चुकलेल्या सदस्यांची कानउघाडणी करू शकेल का? अशा अनेकविध चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या पाहायला मिळाल्या होत्या.

हेही वाचा: “गाड्या उडतात, माणसं उडतात अन्…”, प्रभासला ‘जोकर’ म्हटल्यावर अर्शद वारसीचा दाक्षिणात्य चित्रपटांबद्दलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, रितेश देशमुखने पहिल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यापासून ते चौथ्या आठवड्यापर्यंत प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

या आठवड्यात रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरच्या वागण्यावर जळजळीत टीका करीत तिला तुरुंगामध्ये राहण्याची शिक्षा दिली आहे. आता या पर्वाला चार आठवडे पूर्ण झाले असून, पाचव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कोणता नवीन कल्ला होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader