Bigg Boss Marathi 5 मधील स्पर्धक सातत्याने चर्चेत असलेले पाहायला मिळतात. त्यापैकी सगळ्यात जास्त निक्की आणि अरबाज यांच्या मैत्रीची चर्चा झाली. आता घराबाहेर पडल्यानंतर अरबाज पटेलने निक्कीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ते आजही मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. अरबाज जेव्हा घरातून बाहेर पडत होता, त्यावेळी निक्की ज्या प्रकारे वागली होती, त्यावर पंढरीनाथ कांबळेने वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले पंढरीनाथ कांबळे?

बिग बॉस मराठी ५ मधून बाहेर पडल्यावर पंढरीनाथ कांबळेने ‘कलाकट्टा’ला मुलाखत दिली. यावेळी तुम्ही बाहेर येताना सूरज फार भावुक झालेला दिसला नाही, यावर तुम्ही काय सांगाल? त्याबाबत बोलताना पंढरीनाथ कांबेळेने म्हटले, “एक तर तो दिखावा करणारा मुलगा नाही. त्याला जे वाटतं, ते तो मनापासून करतो. अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर जाताना निक्कीने आकांडतांडव केला होता. घरातून प्रेतयात्रा निघाल्यासारखं तिने केलं होतं. आम्ही बसायचो, उठायचो, मग बघायचो तर ते चालूच होतं. तर एवढं शो ऑफ करायची गरज नाही. ते नंतर काय झालं? म्हणजे ते खोटंच होतं ना सगळं. सुरुवातीपासून काही खरं नव्हतं, तो शोऑफ खोटा होता. आईनं येऊन सांगितल्यानंतर कळलं तिला ‘अरे बापरे हे असं आहे.’ अरबाजचा जो स्टॅच्यू तिने बाजूला करून ठेवला होता. तिला तो आवरून ठेवायला लागला. कुठलं काय दाखवायचं तुम्हाला ते मला कळतच नाही. तर ते सगळं खोटं होतं.”

पुढे पंढरीनाथ कांबळेने म्हटले, “तसं सूरजचं मला वाटत नाही. त्याला मनातून नक्की वाईट वाटलं असणार. मी १०० टक्के सांगतो. येताना फक्त येऊन मिठी मारली त्याने. त्या मिठीमध्ये मला सगळं लक्षात आलं. मी त्याला म्हटलं, “वेडा आहेस का?आठवडाभरानं पुन्हा भेटायचंच आहे. त्याला तो शोऑफ करायची गरज नाही, माझ्यासाठी तरी. त्यानं कॅमेऱ्यासाठी आणि बाकीच्या सदस्यांसाठी त्यानं तो केला असता. पण तो माझ्याशी जोडला होता, तर त्याला मला काही गोष्टी सांगायच्या होत्या. मला माहितेय त्याच्या गोष्टी कशा कळतात आणि त्यालाही माहितेय. त्यानं जी मिठी मारली होती, ती घट्ट मिठी होती. ती बाकी कोणाला जाणवणार नाही. माझी अशी इच्छा आहे आणि मी प्रार्थना करतोय की ट्रॉफी त्यानं जिंकावी आणि त्याला जास्त गरज आहे त्या ट्रॉफीची; जेणेकरून त्याचं पुढचं आयुष्य सुखकर होईल.”

हेही वाचा: तुषार कपूरची दोन फेसबुक अकाउंट हॅक; चाहत्यांना माहिती देत म्हणाला, “माझी टीम…”

दरम्यान, पंढरीनाथ कांबळे बिग बॉसच्या घरातून नुकतेच बाहेर पडला आहे. बिग बॉसच्या शोमधून बाहेर आल्यानंतर त्याने बिग बॉस शोबाबत आणि सदस्यांविषयी केलेली वक्तव्ये सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 after elimination pandharinath kamble on nikki tamboli how she cried when arbaz leaving the show is showoff nsp