Bigg Boss Marathi 5 चे पर्व सध्या विविध कारणांनी गाजत आहे. दरदिवशी बिग बॉसच्या घरातील सदस्यांची मोठी चर्चा होताना दिसते. या पर्वातील घरातील सदस्यांमधील भांडणे हा प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय असलेला पाहायला मिळतो. आता कलर्स मराठीने सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करत प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चौथ्या आठवड्यात पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यानंतर घरातील सदस्यांची समीकरणे बदललेली पाहायला मिळत आहेत. रितेश देशमुखने घरातील सदस्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केल्याचे पाहायला मिळाले.
जान्हवीच्या कृत्याबद्दल तिला तुरुंगात राहण्याची शिक्षा दिली. तसेच घरातील इतर सदस्य निक्कीला चालवत असल्याचे म्हटले. महत्त्वाचे म्हणजे, निक्की तांबोळीला तिच्याच ग्रुपमधील लोक तिच्या पाठीमागे तिच्याविषयी काय बोलतात, याचे व्हिडीओ दाखवण्यात आले. त्यानंतर निक्की आणि तिच्या टीम एमध्ये फूट पडली आणि त्यांच्यामध्ये मोठी भांडणं झाल्याचे पाहायला मिळाले.
आता निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये आलेल्या दुराव्यानंतर घरातील इतर सदस्य त्यांना चिडवत असल्याचे दिसत आहे. सूरज चव्हाण, आर्या, जान्हवी किल्लेकर हे ‘ठुकरा के मेरा प्यार’, ‘मुझे छोडकर जब तुम जाओगे’ ही गाणी म्हणत असून अरबाज पटेल त्यांच्याजवळ बसलेला आहे; तर काही अंतरावर अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी बसलेले आहेत. इतर सदस्य गाणी म्हणत असताना निक्की अभिजीतला, चल आपण आत जाऊ, यांचं काय चाललंल? असे म्हणताना दिसते.
काय म्हणाले नेटकरी?
आता बिग बॉसच्या घरातील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने, “बिग बॉसची राणी निक्की तांबोळी” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या नेटकऱ्याने, “एका निक्कीला हरवायला सगळे एक झाले” असे म्हटले आहे. एक नेटकरी म्हणतो, “निक्की तांबोळीने तिच्या ग्रुपसाठी खूप काही केले, ती चांगल्याप्रकारे खेळ खेळत असल्याचे म्हटले आहे.”
एका नेटकऱ्याने, ” निक्की तू यांच्या नादी लागू नकोस, अभिजीत आणि तू एकदम भारी खेळत आहे”, असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “कालच्या एपिसोडनंतर कळाले की या घरातील सगळेच सदस्य स्वार्थी आहेत. याआधीच्या पर्वात अनेक चांगली नाती पाहायला मिळाली होती.” तर अनेकांनी निक्कीच्या खेळाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
आता या आठवड्यात आणखी कोणता कल्ला होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे