Bigg Boss Marathi 5 Updates:बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले उद्या (६ ऑक्टोबर रोजी) होणार आहे. त्यापूर्वी आजच्या भागात या पर्वातील सर्व एलिमिनेटेड सदस्य घरात प्रवेश घेतील. कलर्स मराठीने नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यात घरातून बाहेर पडलेले सदस्य दिसत आहेत, पण त्यापैकी एका सदस्याला बोलावण्यात आलेलं नाही. या सदस्याला न बोलावल्याबद्दल नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.
बिग बॉस मराठी ५ चा नवीन प्रोमो कलर्सने शेअर केला आहे. त्यात घरातील टॉप ६ सदस्य बाहेर गेलेल्या सर्व स्पर्धकांना पाहून आनंदी होतात. सध्या बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर हे सदस्य आहेत. त्यांचं घराबाहेर गेलेल्या स्पर्धकांशी रियुनियन होणार आहे.
हेही वाचा– Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरवण्यासाठी आवडत्या स्पर्धकाला वोट कसे करायचे? जाणून घ्या
घराबाहेर गेलेला एक सदस्य गैरहजर
घरात पुरुषोत्तमदादा पाटील, घनश्याम दरवडे, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, वर्षा उसगांवकर, संग्राम चौगुले, पंढरीनाथ कांबळे, अरबाज पटेल, योगिता चव्हाण, निखिल दामले यांची घरात एंट्री होताना व्हिडीओत पाहायला मिळते. पण या सर्वांमध्ये एक सदस्य दिसत नाही. निक्कीला मारल्याने घराबाहेर गेलेली आर्या जाधव या रियुनियनमध्ये नसल्याचं व्हिडीओत दिसून आलं. या व्हिडीओवर काही प्रेक्षकांनी आर्याबद्दल कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा – Bigg Boss 18: सलमान खानचा शो केव्हा, कुठे पाहता येणार? जाणून घ्या प्रिमियरची तारीख अन् स्पर्धकांची नावं
एका टास्कमध्ये आर्या जाधव व निक्की तांबोळीचं भांडण झालं होतं. त्यानंतर रागाच्या भरात आर्याने निक्कीला कानाखाली मारली होती. बिग बॉसने तिला एक दिवस जेलमध्ये ठेवल्यानंतर भाऊच्या धक्क्यावर घरातून निष्कासित केलं होतं. आर्याला कुणालाही न भेटू देता घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर आता रियुनियनमध्येही ती बिग बॉसमध्ये आल्याचं दिसत नाही, याबद्दल काही नेटकऱ्यांनी प्रोमोवर कमेंट्स केल्या आहेत.
आर्याला बिग बॉसने रियुनियनसाठी बोलावलं नाही याबद्दल काही प्रेक्षकांनी व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान आज निक्की व अरबाजची घरा भेट होणार आहे. निक्कीच्या आईने अरबाजचा साखरपुडा झाल्याचं तिला सांगितलं होतं, त्यानंतर हे दोघे आज पहिल्यांदाच भेटणार आहेत, त्यामुळे आता अरबाज निक्कीची समजूत कशी काढतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.