Bigg Boss Marathi Last Week: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या शेवटच्या आठवड्याची सुरुवात भांडणाने झालेली दिसत आहे. पंढरीनाथ कांबळे घराबाहेर गेल्यानंतर शोचा नवीन प्रोमो आला आहे, ज्यात चांगले मित्र असलेले अंकिता वालावलकर व अभिजीत सावंत यांच्या कडाक्याचं भांडण पाहायला मिळत आहे.

कलर्स मराठीने शोचा प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये घरातील कामाच्या वाटपावरून अंकिता व अभिजीतमध्ये भांडण झालेलं पाहायला मिळतंय. या भांडणाचं निमित्त निक्की ठरली आहे. प्रोमोची सुरुवात अंकिताच्या बोलण्याने होते. “तिला डायनिंग टेबल देऊन तू स्वतःवर घेतोयस” असं अंकिता म्हणाली. त्यावर अभिजीत तिला “तुला जर वाटतंय की तुझ्या ड्युटीज जास्त आहे मग तू तिला बोल ना” असं म्हणतो. यावर अंकिता त्याला म्हणते, “सगळीकडे तू जेंटलमन बनून येतोस, तर ये ना इथेही जेंटलमन बनून.” अभिजीत म्हणाला, “मी माझी ड्युटी माझ्या सुविधेप्रमाणे घेतली, त्यात मी चुकीचा काय आहे?” यावर अंकिता चिडून म्हणते, “तेव्हा तू बोललास यार.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी सुरक्षित होताच अरबाज पटेलची प्रतिक्रिया, म्हणाला…

पाहा प्रोमो –

बिग बॉसचा हा शेवटचा आठवडा आहे. फिनालेला अवघे काही दिवस उरले असताना अभिजीत व अंकिता यांचं घरातील कामांच्या वाटपावरून जोरदार भांडण झालं. हा प्रोमो पाहिल्यावर काही स्पर्धक अंकिताची बाजू घेतली आहे.

हेही वाचा – “मी सूरजचं पालकत्व…”, घराबाहेर जाताना पंढरीनाथ कांबळेने सांगितला मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक

दरम्यान, बिग बॉस मराठी १०० दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या शोचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पंढरीनाथ कांबळे एलिमिनेट झाल्यावर शोमध्ये वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर व धनंजय पोवार हे सात स्पर्धक आहेत. या सात जणांपैकी कोण बाहेर जाणार आणि कोण विजेता होणार हे रविवारी कळेल.