Bigg Boss Marathi 5 चे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी बिग बॉसने दिलेले टास्क, कधी स्पर्धकांमधील भांडणे, वाद-विवाद तर कधी सदस्यांमध्ये होणाऱ्या चर्चा यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनत असतात. आता कलर्स मराठी वाहिनीने काही सदस्यांमधील होणाऱ्या चर्चांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता वालावलकर, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, घन:श्याम दरडे हे चार सदस्य किचन परिसरात असून त्यांच्यामध्ये अभिजीत सावंतविषयी चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
MNS Leader PAddy Kamble
Ameya Khopkar : मनसे नेत्याची बिग बॉसच्या स्पर्धकासाठी खास पोस्ट; म्हणाले, “जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या कलकलाटाकडे…”
Bigg Boss Marathi 5
Video: निक्की तांबोळीमुळे टीम बीमध्ये होणार कल्ला; अंकिता वालावलकरने जाब विचारताच, धनंजय पोवार म्हणाला, “मी तुमच्याशी…”
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
Bigg Boss Marathi 5
Video: बिग बॉसच्या ‘त्या’ निर्णयामुळे घरातील सदस्यांची बोलती बंद; निक्की-अभिजीतकडे पाहून अंकिता म्हणाली, “आज कळलं…”
big boss marathi these contestants nominated in this week
Bigg Boss Marathi : घरातील ६ सदस्य झाले नॉमिनेट! पण, नेटकऱ्यांकडून अंकिताचं कौतुक, काय आहे कारण?
Bigg Boss Marathi 5
Video: आर्या झाली अरबाजसाठी भावुक; नेटकरी म्हणाले, “हिने तर सगळेच…”

अभिजीत सावंतबद्दल काय म्हणाली अंकिता वालावलकर?

व्हिडीओच्या सुरुवातीला, अंकिता वालावलकर अरबाज पटेल आणि वैभव चव्हाणला म्हणते, “पहिल्या आठवड्यातील पहिला टास्क, त्यावेळी अभिजीत बोलला होता. त्यावेळी मी म्हटलं होतं की वाह, अभिजीत सावंत बोलला, त्याने भूमिका घेतली. कारण त्याआधी मी, निक्की आणि अभिजीत असे तिघे जण बसलो होतो. त्यावेळी निक्की अभिजीतला म्हणत होती, तुझं ठीक आहे, माझं ठीक आहे; पण हिचं काय? त्यावेळी अभिजीत सावंतने काहीच भूमिका घेतली नाही. तो काहीच बोलला नाही. जो माणूस भूमिका घेणारा असतो, तो पहिल्या दिवसापासून भूमिका घेतो. त्यानंतर मी त्याला याबद्दल विचारलं होतं. त्यावर तो मला म्हणाला होता की, माझं अजून ठरलं नाही की कोणत्या टीममध्ये जायचं आहे.”

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

तिच्या या बोलण्यावर अरबाज पटेल म्हणाला, मी तुला सांगतो त्याची एक समस्या आहे. तो मला म्हटलेला, त्याला आत्ममग्न राहायची सवय आहे. जर तो आमच्या टीममध्ये आला तर त्याला तितके महत्त्व मिळणार नाही. पण, तो तुमच्या टीममध्ये आला तर त्याला महत्त्व मिळेल. म्हणून आता तो तुमच्या टीममध्ये नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतोय.” अरबाजच्या या म्हणण्याला वैभवने दुजोरा दिला आहे.

हेही वाचा: Glycerine राहिलं, बाहेर आल्यावर पुरस्कार अन्…; जान्हवीने माफी मागितल्यावर मराठी कलाकारांनी उडवली खिल्ली; म्हणाले…

बिग बॉसच्या पाचव्या पर्वाला आता तीन आठवडे पूर्ण झाले असून सर्व स्पर्धकांचा गेम प्रेक्षकांना दिसण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक जे सदस्य उत्तम खेळतात, त्यांचे कौतुक करताना दिसतात, तर जे इतर सदस्यांबरोबर वाईट वागतात, त्यांच्यावर टीका करताना दिसतात. भाऊच्या धक्क्यावरदेखील ज्या सदस्यांनी चुका केल्या आहेत, त्यांची कानउघाडणी केलेली दिसते. आता बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनचा टास्क रंगलेला पाहायला मिळत आहे. आता कोणते सदस्य कोणाला नॉमिनेट करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.