Arbaz Patel Girlfriend Leeza Bindra Announcement : ‘बिग बॉस मराठी ५’ मधील स्पर्धक अरबाज पटेलमुळे गेले काही दिवस त्याची गर्लफ्रेंडही चर्चेत आहे. अरबाज व निक्कीची (Nikki Tamboli Arbaz Patel) जवळीक आणि बाहेर असलेली त्याची गर्लफ्रेंड या सर्वांची खूपच चर्चा आहे. अरबाज बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 5) घरात गेल्यावर त्याची गर्लफ्रेंड पोस्ट करत असते. आता तर तिने सोशल मीडियावर एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काही दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये ‘दुर्गा’ मालिकेचे कलाकार आले होते, तेव्हा त्याला त्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता, त्याचं उत्तर देताना आपण कमिटेड असल्याचं म्हणजे रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने म्हटलं होतं. एकीकडे घरात अरबाज अन् निक्कीचं प्रेम फुलत होतं, तर दुसरीकडे त्याची बाहेर गर्लफ्रेंड आहे हे कळताच घरातील सदस्य व प्रेक्षक सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
Bigg Boss Marathi: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडची नवीन पोस्ट; म्हणाली, “तो आणि निक्की…”
बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अरबाजने एका मुलाखतीत त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव सांगितलं होतं. तिचं नाव लीझा बिंद्रा आहे. लीझा व अरबाज यांनी एकमेकांबरोबरचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. लीझा व मी एकत्र खूप छान दिसतो. आम्ही एकत्र व्हिडीओ बनवतो. आम्हाला लग्न करायचं आहे, असं अरबाज या मुलाखतीत म्हणाला होता. पण बिग बॉसच्या घरात मात्र त्याची व निक्कीची जवळीक पाहायला मिळत आहे. अरबाजबद्दल मेसेज व कमेंट्स करू नका असं ती काही दिवसांपूर्वी म्हणाली होती. त्यानंतर तिने निक्की व अरबाजबद्दल वाईट बोलू नका अशी विनंती तिच्या चाहत्यांना केली होती. आता तिने सोशल मीडियावर मोठा निर्णय सांगितला आहे.
Arbaz Patel Girlfriend: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ती कोण आहे, काय करते? जाणून घ्या
लीझाची पोस्ट नेमकी काय?
Leeza Bindra Post: लीझाने इन्स्टाग्रामवर तिचा एक सेल्फी पोस्ट करत ती सोशल मीडियापासून दूर जात असल्याचं सांगितलं आहे. “मी काही काळासाठी सोशल मीडिया सोडत आहे. सर्वांना प्रेम. हसत राहा,” असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
लीझाच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
लीझाच्या या पोस्टवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. ‘अरबाज कुठे आहे?’ ‘दुसऱ्यांमुळे स्वतःचे नुकसान करू नकोस,’ ‘तुझे स्टँडर्ड अरबाज आणि निक्की पेक्षा जास्त आहेत, त्यामुळे मजबूत राहा आणि आयुष्यात पुढे जा,’ ‘तू कोणत्या त्रासातून जातेयस ते आम्हाला माहीत आहे, प्लीज सोशल मीडिया सोडू नकोस,’ लीझा बिग बॉस मराठीमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री बनून जा,’ अशा कमेंट्स लीझाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या भाऊचा धक्कामध्ये होस्ट रितेश देशमुखने अरबाजवर चांगलीच टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. तुम्ही हा शो कलर्स मराठी व जिओ सिनेमावर पाहू शकता.