Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सुरू आहे. या पर्वात निक्की तांबोळी व अरबाज पटेल (Arbaz Patel) या दोघांची सतत चर्चा असते. शोच्या सुरुवातीपासूनच निक्की व अरबाज यांच्यात प्रेम फुलत असल्याचं दिसत होतं. घनश्यामने निक्कीला वहिनी म्हणून हाक मारली होती, तसेच अरबाजने निक्कीला (Nikki Tamboli) वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून कॅप्टनशिप दिली होती. घरातील सदस्यही त्या दोघांबद्दल बोलताना दिसायचे. त्यानंतर निक्की व अरबाजची भांडणं झाल्याचं पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसच्या घरात निक्कीबरोबर अरबाजचं नाव जोडलं गेलं. पण ‘दुर्गा’ मालिकेतील कलाकार बिग बॉसच्या घरात आले. तेव्हा एका प्रश्नाचं उत्तर देताना अरबाजने आपण कमिटेड असल्याचा खुलासा केला. बिग बॉसमध्ये जाण्याआधी त्याने एक मुलाखत दिली होती, त्यात गर्लफ्रेंडचं नाव सांगितलं होतं आणि लवकरच तिच्याशी लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. तर अरबाजची गर्लफ्रेंड लीझा बिंद्रा (Arbaz Patel Girlfriend Leeza Bindra) ही अरबाज व निक्कीमुळे दुखावली गेली आहे असं दिसत आहे.

Arbaz Patel Girlfriend: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ती कोण आहे, काय करते? जाणून घ्या

कंटेंट क्रिएटर व मॉडेल लीझा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या अलीकडच्या काही पोस्टवर चाहत्यांच्या खूप कमेंट्स होत्या. या कमेंट्स अरबाज व निक्कीबद्दलच्या होत्या. यापैकी काहींना लीझाने उत्तरं दिली होती. पण नंतर तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून अरबाजबद्दल मेसेज किंवा कमेंट करू नका, असं चाहत्यांना आवाहन केलं होतं. या संपूर्ण प्रकारानंतर तिने नुकतीच एक पोस्ट केली आहे. तिने बॉलीवूड अभिनेत्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

अरबाज पटेल व लीझा बिंद्रा (फोटो – इन्स्टाग्राम)

Bigg Boss Marathi 5: निक्कीमुळे अरबाज पटेलचं ब्रेकअप? गर्लफ्रेंडने नाव घेत केली पोस्ट; म्हणाली, “मला त्याच्याबद्दल…”

“Courtesy is as much a mark of a gentleman as courage,” असं कॅप्शन देत लीझाने टायगर श्रॉफबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. लीझाच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. लीझा खूप सुंदर दिसत आहेस, असं अनेकांनी कमेंट्स करून म्हटलं आहे.

लीझा बिंद्रा पोस्ट

दरम्यान, लीझा व अरबाजबद्दल बोलायचं झाल्यास ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अरबाजने लीझाचं नाव घेत रिलेशनशिपमध्ये असल्याची बाब जाहीर केली होती. दोघांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एकमेकांबरोबरचे अनेक फोटो पाहायला मिळतात. पण बिग बॉसच्या घरात निक्की व अरबाज यांचं जे काही चाललंय ते पाहता लीझा नाराज असल्याचं तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 arbaz patel girlfriend leeza bindra shared photo with tiger shroff hrc