Bigg Boss Marathi 5चे पर्व पहिल्या दिवसापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. कधी घरात होणाऱ्या टास्कमुळे तर कधी घरातील सदस्यांच्या भांडणामुळे बिग बॉसच्या घराची कायमच चर्चा होत असते. आता मात्र बिग बॉसने पंढरीनाथ कांबळेंना तुम्ही निक्कीच्या बोटीत जाऊन बसला, असे म्हटल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसच्या घरात नेमके घडले काय?

कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये वैभव, पंढरीनाथ आणि धनंजय एका सोफ्यावर बसले आहेत आणि निक्की त्यांच्या बाजूच्या सोफ्यावर बसली असल्याचे दिसत आहे. पंढरीनाथ कांबळे वर्षा उसगांवकर यांच्याशी कोणत्या तरी विषयावर बोलत आहे, तेवढ्यात बिग बॉस त्यांचे नाव घेतात. स्वत:चे नाव ऐकल्याबरोबर पंढरीनाथ कांबळे म्हणतात, “आदेश बिग बॉस.” त्यावर बिग बॉस म्हणतात, “शर्ट छान आहे.”

पंढरीनाथ कांबळे म्हणतात, “थँक्यू बिग बॉस.” त्यानंतर बिग बॉस म्हणतात, गोव्याचे फॅन आहात का? बिग बॉसच्या या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटले, “हो बिग बॉस, मला गोवा फार आवडते. माझं ड्रीम डेस्टिनेशन आहे.” त्यावर बिग बॉसने पंढरीनाथ कांबळेंना विचारले, “तिथे जाऊन काय करता?” हा प्रश्न विचारताच शेजारी बसलेला धनंजय पोवार हसत असून ‘तेरे नाम’ हे गाणे म्हणताना दिसत आहे. त्याला शांत बसवून पंढरीनाथ म्हणतात, “नाटकाचे प्रयोग असतात, सिनेमाचं शूटिंग असतं, त्यामुळे वरचेवर गोव्याला जावं लागतं”, असं पंढरीनाथ म्हणतात. बिग बॉस म्हणतात, “धनंजय काहीतरी वेगळेच म्हणत आहेत.”

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

बिग बॉसने असे म्हटल्यावर त्या सोफ्यावरून उठत पंढरीनाथ म्हणतात, ते त्यांनाच विचारा बिग बॉस, मी काही बोलत नाही; असे म्हणून ते निक्की बसलेल्या सोफ्यावर बसतात आणि म्हणतात की, मी वेगळ्या बोटीत आलो. त्यावर बिग बॉस म्हणतात, थेट निक्कीच्या बोटीत आला तुम्ही. बिग बॉसने असे म्हटल्याबरोबर घरात सगळे जण हसत असल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: थ्रिलर हिंदी चित्रपटात एकत्र झळकणार रितेश देशमुख अन् प्रिया बापट! पहिली झलक आली समोर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

दरम्यान, पंढरीनाथ कांबळे आणि निक्कीमध्ये मतभेद असून अनेकवेळा त्यांच्यात भांडण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता या आठवड्यात कोण कल्ला करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 bigg boss kidding with pandharinath kamble asked about goas plan new promo nsp