Bigg Boss Marathi 5 च्या घरात कधी काय होईल याचा अंदाज बांधता येत नाही. या घरात अचानक भांडण होताना दिसते, थोड्या वेळाने भांडणारे लोक एकत्र मजा करताना दिसतात. कधी अपशब्द बोलले जातात, तर कधी कौतुक केले जाते. आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओची खूपच चर्चा रंगताना दिसत आहे.

‘कलर्स मराठी’ या वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘बिग बॉस’च्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये घरातील काही सदस्य बाथरूममध्ये असून, ते ‘दिवाना है देखो’ गाणे गाताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”
two friends conversation morning walk joke
हास्यतरंग : मॉर्निंग वॉक…
husband wife to look married joke
हास्यतरंग : लग्न झालेलं…
Bigg Boss 18 salman khan kamya Punjabi slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: “फक्त लूक आणि आवाजावर…”, सलमान खान-काम्या पंजाबीने विवियन डिसेनाची केली कानउघडणी, काय म्हणाले? जाणून घ्या…
Bigg Boss 18 salman khan slams chahat pandey on weekend ka vaar
Bigg Boss 18: अविनाश मिश्राला ‘स्त्रीलंपट’ म्हणण्यावरून सलमान खान भडकला, चाहत पांडेचा ‘तो’ फोटो दाखवत केली पोलखोल

व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, निखिल दामले, सूरज चव्हाण, इरिना हे सदस्य बाथरूममध्ये आहेत. यावेळी अभिजीत ‘दिवाना है देखो’ हे गाणे गात आहे आणि धनंजय पोवारदेखील त्याला साथ देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. इतर सदस्य ते गात असलेल्या गाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. त्याबरोबरच किचनमध्ये असलेली जान्हवीदेखील काम करतानाच गाण्याचा आवाज येताच त्यावर ताल धरताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

काय म्हणाले नेटकरी?

आता नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने, “अभिजीत गात असताना कृपया इतरांनी गाऊ नये, असा प्रेक्षकांचा मेसेज बिग बॉस आत पाठवा,” असे म्हणत हात जोडल्याच्या आणि हसण्याच्या इमोजी टाकल्या आहेत.

अभिजीत सावंतने गेल्या आठवड्यात त्याचे ‘गुणगुणावे गीत गावे’ हे लोकप्रिय गाणे गात प्रेक्षकांची मने जिंकली होती. बिग बॉसच्या घरातील त्याचा वावर आणि खेळ प्रेक्षकांना आवडत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: Video: श्रीदेवींच्या जन्मदिनानिमित्ताने लेक जान्हवी कपूरने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, बॉयफ्रेंडसह नतमस्तक होऊन घेतले आशीर्वाद

दरम्यान, याआधी समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसने अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या दोन सदस्यांना पॉवर कार्ड दिल्याचे पाहायला मिळाले. हे पॉवर कार्ड त्यांनी सेफ होण्यासाठी वापरले. मात्र, आता त्याचा परिणाम इतर सदस्यांवर काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच, बिग बॉसच्या पाचव्या पर्वाच्या दुसऱ्या आठवड्यात एकही सदस्य घराबाहेर गेला नाही. त्यामुळे या आठवड्यात कोणते सदस्य घराला निरोप देण्यासाठी ऩॉमिनेट होणार हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. बिग बॉसचे पाचवे पर्व हे पहिल्या दिवसापासूनच वाद आणि भांडण यांमुळे गाजताना दिसत आहे. आता पुढे घरातील समीकरणे कशी बदलणार, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader