Bigg Boss Marathi 5 चे पाचवे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले पाहायला मिळते. कधी घरातील स्पर्धकांची भांडणे, वाद-विवाद तर कधी बिग बॉसने दिलेला टास्क, तर कधी स्पर्धकांमधील संवाद या चर्चांचा कारण बनतात. आता मात्र बिग बॉस आणि धनंजय पोवार यांच्यामध्ये रंगलेल्या संवादाची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

धनंजय पोवारच्या तक्रारीवर बिग बॉसचे उत्तर

‘कलर्स मराठी’ने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सुरुवातीला अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार एकमेकांशी बोलत असतात. धनंजय पोवार कॅमेराकडे बघून अंकिताला संबोधत म्हणतो की, “सारखा फोकस हिच्याकडेच देणार आहे का? कोल्हापूरच्या लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी इथे आलोय आणि माझ्याकडे काम काय? ही रडली, हिला हसवा, योगिता रडली, तिला हसवा. तो सूरज येऊन मुठ्या आवळतोय, बोटं मोडतोय, केस ओढतोय तर गप बसायचं”, असे धनंजय पोवार म्हणतो. तेवढ्यात बिग बॉसचा आवाज येतो.

Yogita Chavan
“योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
Bigg Boss Marathi Season 5 Siddharth Jadhav Angry On Janhvi Killekar for insulted pandharinath kamble
“एकदा का तो सुटला की तुझी…”, पंढरीनाथ कांबळेबद्दल बोलणाऱ्या जान्हवीवर भडकला सिद्धार्थ जाधव, म्हणाला…
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
MNS Leader PAddy Kamble
Ameya Khopkar : मनसे नेत्याची बिग बॉसच्या स्पर्धकासाठी खास पोस्ट; म्हणाले, “जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या कलकलाटाकडे…”
Dhananjay Powar wife and mother expressed displeasure accusing of Bigg Boss marathi
Video: धनंजय पोवारच्या पत्नी व आईने ‘बिग बॉस’वर आरोप करत व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या, “त्याला दाखवतंच नाहीये काय भानगड…”
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
कलर्स मराठी इन्स्टाग्राम

ते अंकिताला विचारतात, तुमच्या शर्टवर काय लिहिलंय. तर ती हसत सांगते, ‘जळततं मेले’ असं लिहिलय. बिग बॉस म्हणतात, धनंजय यांचं तेच सुरू आहे. धनंजय पोवार म्हणतो, बिग बॉस हिच्यावर जळू? हिच्यावर? त्यावर अंकिता म्हणते, नाकावर बोललात ना माझ्या? हा संपूर्ण संवाद मजेत सुरू असून सगळे हसताना दिसत आहेत.

हेही वाचा: “एकदा का तो सुटला की तुझी…”, पंढरीनाथ कांबळेबद्दल बोलणाऱ्या जान्हवीवर भडकला सिद्धार्थ जाधव, म्हणाला…

बिग बॉसचे पाचवे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पहिल्या दिवसापासून या घरात वाद सुरू आहेत. याबरोबरच घरात दोन गट पडले असून सदस्यांची विभागणी झालेली आहे. त्यांच्यामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडण होताना दिसते. महत्त्वाचे म्हणजे, घरातील सदस्य एकमेकांशी वागत असलेल्या अनेक गोष्टींवरून बाहेरच्या जगातदेखील त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळतात. अनेक कलाकार घरात काही सदस्य ज्या पद्धतीने इतर सदस्यांवर वक्तव्य करतात, त्यावर बोलताना दिसतात.

दरम्यान, पाचव्या पर्वातील तिसरा आठवडा पूर्ण झाला असून चौथ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. आता या आठवड्यात घरात काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.