Bigg Boss Marathi 5 व्या पर्वातील सदस्य शो संपल्यानंतरदेखील मोठ्या चर्चेत आहेत. मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे, विविध कार्यक्रमांमध्ये लावलेल्या हजेरीमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. याबरोबरच सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडीओदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. आता बिग बॉसच्या घरात सहभागी होत आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या धनंजय पोवारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय पोवारने इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराबाहेर येताना दिसत आहे. तो येताच शाळेची मुले त्याच्याभोवती जमलेली दिसत आहेत. त्यानंतर इरिना, वैभव चव्हाण यांच्याभोवती या मुलांनी गराडा घातल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय, वैभव, इरिना शाळेतील मुलांशी बोलतानादेखील दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना धनंजय पोवारने ‘कमाई..’ असे लिहिले आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले नेटकरी?

धनंजय पोवारने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “डीपी दादा काय करता त्या ट्रॉफीला, खरंतर हाच विजय आहे; मुलांचं प्रेम”, दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “बाई, काय हा प्रकार,किती छान.” एक नेटकरी लिहितो, “तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला ती तुमची खरी कमाई दादा.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “डीपी दादा बाकी काही माहीत नाही, पण तू माणूस म्हणून राजा आहेस”, असे म्हणत चाहत्यांनी धनंजय पोवारचे कौतुक केले आहे.

धनंजयने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एका मुलाखतीत, “वडिलांबरोबर ३२ वर्षे अबोला होता. जेवलास का, वैगेरे इतकंच आम्ही कामापुरते बोलायचो. पण बिग बॉसमुळे तो अबोला दूर झाला,” असे म्हटले होते. याबरोबरच, जेव्हा त्याचे वडील बिग बॉसच्या घरात आले तेव्हा ते दोघेही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: ठरलं तर मग : सायली-मधुभाऊंना धक्का! केसचा निकाल महिपतच्या बाजूने, पण ऐनवेळी अर्जुन घेणार ‘तो’ निर्णय, पाहा प्रोमो

दरम्यान, धनंजयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बिग बॉस मराठीमधील इरिना आणि वैभव देखील दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात इरिना आणि वैभव यांची मैत्री प्रेक्षकांना आवडत होती. मात्र, धनंजय पोवार आणि वैभव चव्हाण यांच्यातील मैत्री घराबाहेर दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण बिग बॉसच्या घरात दोघेही वेगवेगळ्या गटातून खेळत असल्याचे पाहायला मिळत होते.

आता बिग बॉसनंतर या सगळ्या स्पर्धकांमध्ये कसे नाते असणार आणि त्यांच्या करिअरची वाटचाल पुढे कशी असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 fame dhananajay powar shares video on social media netizens praises him nsp