बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर अंतिम फेरीत पोहोचली होती. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून घराघरांत पोहोचलेली ही अभिनेत्री अनेक कारणांमुळे चर्चेत असते. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी जान्हवीने १०० कपडे आणि ४० नाईट ड्रेस खरेदी केले होते. त्यांचा ती लिलाव करणार अशा अफवा पसरल्या होत्या. त्यावरच स्पष्टीकरण देणारा तिने केलेला व्हिडीओ, नुकताच सूरजच्या घरी जाऊन तिने तयार केलेला व्हिडीओ असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. दिवाळीच्या सणादिवशी घराघरांत लक्ष्मीपूजन केले जाते. किल्लेकर कुटुंबीयांनीदेखील हा सण साजरा केला. तिचा हासुद्धा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जान्हवीने तिच्या घरच्या स्त्रियांचे पाय धुऊन पूजन केले. जान्हवीने तिच्या सासूबाईंचे पाय धुतले. स्वत:च्या साडीच्या पदराने त्यांचे पाय पुसले आणि पूजा केली. दिवाळीच्या निमित्ताने तिच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली. दिवाळीत सर्वांची अशी सेवा केल्यानंतर तिने स्वतःला एक खास गिफ्ट दिले आहे. तिच्या या गिफ्टचा बिग बॉसशी संबंध आहे. जान्हवीने स्वतः एक व्हिडीओ तयार करीत याचा खुलासा केला आहे.

Bigg Boss Marathi fame Ankita walawalkar fish gift to Dhananjay powar for bhaubij
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरने भाऊबीजनिमित्ताने धनंजय पोवारला दिलं हटके गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वहिनीला…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
savlyachi Janu Savali fame veena jagtap gift to megha dhade
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल
bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Jahnavi Killekar
Video : माहेरी गेलेल्या जान्हवी किल्लेकरचं घरी ‘असं’ झालं स्वागत; तिच्या मुलाच्या कृतीनं वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “सोपं नाही महाराष्ट्राला…”
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव

हेही वाचा…Video: ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने दिवाळीच्या मुहूर्तावर घेतली नवी आलिशान गाडी, पाहा व्हिडीओ

जान्हवीने खरेदी केलं खास ब्रेसलेट

जान्हवीने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला जान्हवीने सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याच व्हिडीओत दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने तिने स्वतःला एक गिफ्ट दिल्याचे सांगितले आहे. जान्हवी म्हणते, “आजचा व्हिडीओ तयार करण्यामागे एक खास कारण आहे. पाडव्याच्या निमित्तानं मी स्वतःला एक गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट तसं छोटंच आहे; पण ते माझ्यासाठी खूप खास आहे.” त्यानंतर जान्हवी गिफ्ट उघडून दाखवते. त्या गिफ्टमध्ये एक ब्रेसलेट असल्याचे दिसते.

म्हणून आहे गिफ्ट खास

जान्हवी या व्हिडीओमध्ये ब्रेसलेट दाखवत म्हणाली, “या ब्रेसलेटमध्ये इव्हिल आय आहे; मात्र माझ्यासाठी हे बिग बॉसचं चिन्ह आहे. बिग बॉस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण- आज मी जी काही आहे, ती बिग बॉसमुळे आहे. मी आता बिग बॉसचं हे ब्रेसलेट हातात घालणार आहे. हे ब्रेसलेट तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी लवकरच बिग बॉसच हे ब्रेसलेट घालून, ते फोटो पोस्ट करणार आहे.”

हेही वाचा…नारकर जोडप्याचा दिवाळी पाडवा! अविनाश यांनी बायकोला काय गिफ्ट दिलं? ऐश्वर्या व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

जान्हवीचा बिग बॉसमधील प्रवास

सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये व्हीलन ठरलेली जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) नंतरच्या काळात ‘टास्क क्वीन’ म्हणून ओळखली जाऊ लागली. पंढरीनाथ कांबळेचीदेखील तिने माफी मागितली. ‘बिग बॉस’च्या घरातील सुरुवातीच्या काळातील तिचा खेळ कोणालाच पटला नव्हता. पण, कालांतराने जान्हवीला तिची चूक उमगली आणि ती निक्की-अरबाजच्या ग्रुपपासून वेगळी होऊन एकटी गेम खेळू लागली. जान्हवी बिग बॉस मराठीच्या अंतिम पर्वात पोहोचली होती.

Story img Loader