‘बिग बॉस’ या छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक नाती बनताना दिसतात. पण ‘बिग बॉस’ संपल्यानंतर याच काही नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो किंवा नाती अधिक दृढ होतात. असं काहीस नातं निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलच आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात निक्की आणि अरबाज यांची चांगलीच गट्टी जमली. काही दिवसांतच दोघांचं मैत्रीचं नातं आणखी घट्ट झालं. मधल्या काळात दोघं दुरावले. तरीही काही काळानंतर दोघं पुन्हा एकत्र आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर अरबाज ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर झाला. यावेळी निक्की तांबोळीने फोडलेला टाहो सगळ्यांनीच पाहिला आहे. पण यानंतर एक ट्विस्ट आला. फॅमिली वीकमध्ये निक्कीच्या आईने तिला अरबाजचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं. यामुळे निक्कीला धक्काच बसला. तिने अरबाज चॅप्टर बंद करायचं ठरवलं. पण तसं काही झालं नाही. ‘बिग बॉस मराठी’च्या अंतिम आठवड्यात दोघांमध्ये झालेले गैरसमज दूर झाले. आता ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर निक्की आणि अरबाजचं नातं आणखी दृढ झालेलं पाहायला मिळत आहे. सतत दोघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : दुसऱ्या दिवशीही ‘सिंघम अगेन’ ‘भुल भुलैया ३’वर पडला भारी, तीन दिवसांतच १०० कोटींची कमाई करणार अजय देवगणचा चित्रपट

सध्या निक्की आणि अरबाजचा एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘वरिंदर चावला’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये निक्की तांबोळीला पापाराझी ‘वहिनी’ म्हणून हाक मारताना दिसत आहे. जेव्हा पापाराझीने ‘निक्की वहिनी’ म्हणून हाक मारली तेव्हा ती लाजली. तिला आश्चर्याचा धक्का बसला. म्हणूनच ती तोंडावर हात ठेवून मागे फिरताना दिसत आहे. त्यानंतर तिने अरबाजबरोबर पोझ दिल्या. मग पापाराझींनी दोघांना दिवाळी कशी साजरी करत आहात? असं विचारलं. त्यावर दोघं म्हणाले, “आम्ही आमच्या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करत आहे.”

हेही वाचा – Video: ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरांचा दिवाळी स्पेशल Reel व्हिडीओ पाहिलात का? नेटकरी करतायत कौतुक

हेही वाचा – Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ची जोरदार सक्सेस पार्टी, सचिन पिळगांवकरांनी सुप्रिया यांच्यासह ‘सत्या’ चित्रपटातील गाण्यावर केला जबरदस्त डान्स

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिवाळीनिमित्ताने निक्की तांबोळीने अरबाजबरोबर एक खास व्हिडीओ शेअर केला होता. दोघांचा हा व्हिडीओ राखी सावंतच्या प्रतिक्रियेमुळे अधिक व्हायरल झाला होता. राखी सावंतने निक्की आणि अरबाजच्या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी देऊन अभिनंदन केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 fame nikki tamboli was called vahini by paparazzi video viral pps