Bigg Boss Marathi 5 Grand Finale Date Viral : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. ५३ दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या शोने टीआरपीचे रेकॉर्ड मोडले आहेत. अशातच हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर हा शो तीन महिने पूर्ण होण्याआधीच बंद होणार, अशी चर्चा रंगली आहे.

बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद झाली. ही पत्रकार परिषद आजच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात येणार आहे. साधारणपणे बिग बॉसचा फिनाले जवळ आला की पत्रकार परिषद घेतली जाते. बिग बॉस मराठी सुरू होऊन फक्त ५३ दिवस झाले आहेत, अशातच अचानक पत्रकार परिषद झाली, त्यामुळे हा शो इतक्या लवकर संपणार का? असं शोचा प्रोमो पाहून प्रेक्षक विचारत आहेत.

बिग बॉस मराठीचा प्रोमो

Bigg Boss Marathi Grand Finale: पत्रकार परिषदेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करून हा शो लवकर संपणार असल्याचं म्हटलं आहे. ‘एवढ्या लवकर पत्रकार?’ ‘६ ऑक्टोबरला फिनाले होणारे.. टॉप 5: अभिजित, सूरज, अंकिता, निक्की अरबाज’, एवढ्या लवकर पत्रकार परिषद?? एवढा जास्त टीआरपी असून सुद्धा’ ‘१०० दिवसांचा शो आहे ७० दिवसामधे नका संपवू,’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.

Bigg Boss Marathi 5 grand finale on 6 october (1)
नेटकऱ्यांनी बिग बॉस मराठीच्या प्रोमोवर केलेल्या कमेंट्स (फोटो – इन्स्टाग्राम)

या प्रोमोशिवाय आणखी एक रील व्हायरल होत आहे, ज्यात बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार असं म्हटलं आहे.

बिग बॉस मराठी टीम किंवा चॅनलकडून या शोच्या ग्रँड फिनालेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण नुकतीच झालेली पत्रकार परिषद आणि हे व्हायरल रील पाहून शो संपणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बिग बॉस हिंदीचे १८ वे पर्व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे, त्यामुळे बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व लवकर संपेल, अशीही चर्चा आहे.

Story img Loader