Bigg Boss Marathi 5 Grand Finale Promo: ७० दिवस प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यावर बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविवारी ६ ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड फिनाले होईल. तत्पूर्वी शोमधील टॉप ६ पैकी आणखी एक सदस्य घराबाहेर जाईल. तसेच मागील दोन आठवड्यांपासून होस्ट रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर गैरहजर होता, तोही या आठवड्यातील शेवटच्या एपिसोडमध्ये दिसेल.
बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो आला आहे, यात शोचा ग्रँड फिनाले, किती वाजता होईल ते सांगण्यात आलं आहे. दोन आठवड्यांपासून गैरहजर असलेला होस्ट रितेश देशमुख ग्रँड फिनालेची घोषणा करताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये तो खेळ अजून संपलेला नसून स्पर्धकांना या सीझनचा सर्वात मोठा धक्का बसणार, असं म्हणताना दिसतोय.
हेही वाचा – Video: ग्रँड फिनालेआधी बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट; घोषणा ऐकताच स्पर्धकांना बसला धक्का, नेमकं काय घडलं?
रितेश देशमुख परतणार
Host Riteish Deshmukh is Back: कलर्सने शोचा नवीन धमाकेदार प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत रितेश देशमुखचा आवाज ऐकायला मिळतोय. “चक्रव्यूह भेदून आता मिळाले आहेत या सीझनचे सुपर सहा…पण खेळ अजून संपलेला नाही मित्रांनो, कारण या सुपर सहांना मिळणार आहे या सीझनचा सर्वात मोठा धक्का..तेव्हा न चुकता बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पहा ६ ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता,” असं प्रोमोमध्ये रितेश म्हणतो. यात सर्वात शेवटी तो बिग बॉसच्या मंचावर एंट्री घेताना दिसत आहे.
हेही वाचा – ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने नाकारली बिग बॉस १८ची ६५ कोटी रुपयांची ऑफर, कोण आहे ती?
पाहा ग्रँड फिनालेचा प्रोमो
टॉप सहा स्पर्धक
बिग बॉस मराठीचे टॉप सहा स्पर्धक अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर व अंकिता प्रभू वालावलकर आहेत. आजच्या एपिसोडमध्ये यापैकी एक सदस्य घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण आज सकाळी बिग बॉसच्या प्रोमोमध्ये लवकरच शोला टॉप ५ सदस्य मिळणार असं म्हटलंय. त्यामुळे वर्षा उसगांवकर घरातून बाहेर पडल्यावर आता आणखी एक सदस्य फिनालेच्या दोन दिवसाआधी शोमधून एलिमिनेट होणार. त्यानंतर जे टॉप ५ सदस्य असतील ते फिनालेमध्ये पोहोचतील आणि त्यापैकी एक विजेता ठरणार. बिग बॉस मराठीच्या ब्लॉकबस्टर पाचव्या पर्वाच्या विजेतेपदाची ट्रॉफी कोणता सदस्य उचलणार ते रविवारी स्पष्ट होईल. सध्या चाहते या शोच्या ग्रँड फिनालेसाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय.