Riteish Deshmukh Bigg Boss Marathi 5 host: ‘बिग बॉस मराठी’चे यंदाचे पर्व महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत आहे. रविवारी (२८ जुलै) पाचव्या पर्वाची दणक्यात सुरुवात झाली आहे. या शोमध्ये १७ सदस्य सहभागी झाले आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा रितेश आता या शोच्या माध्यमातून दर आठवड्याला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेशने ‘बिग बॉस मराठी ५’ होस्ट करण्यासाठी होकार का दिला व त्याच्या या निर्णयावर त्याची पत्नी जिनिलीया देशमुखची (Genelia Deshmukh) प्रतिक्रिया काय होती, ते रितेशने सांगितलं.

‘Bigg Boss Marathi 5’ होस्ट करण्यास होकार का दिला?

“मला या शोचा फॉरमॅट खूप आवतो. एक प्रेक्षक म्हणून हा शो मला गुंतवून ठेवतो. मला मराठी बिग बॉस होस्ट करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. मी नर्व्हस नाही, पण उत्साही आहे. होस्ट नवीन असल्याने अनेक गोष्टी नव्या असतील. त्यामुळे या शोमध्ये काय होणार यासाठी मी खूप उत्साही आहे. बऱ्याचदा मी जिनिलीयाला विचारायचो की मी बिग बॉसमध्ये जाऊ का? मला माहित आहे की जिनिलीया जास्त काळ बिग बॉसच्या घरात राहू शकणार नाही आणि दोन तासांत ती शोमधून बाहेर पडेल. आम्ही दोघे बिग बॉसचे चाहते आहोत आणि शो एकत्र पाहतो,” असं रितेश देशमुख ‘ई-टाइम्स’शी बोलताना म्हणाला.

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात एकूण १६ स्पर्धकांची एन्ट्री! पाहा संपूर्ण यादी, जाणून घ्या नावं

रितेश ‘बिग बॉस मराठी ५’ होस्ट करणार, ‘अशी’ होती जिनिलीयाची प्रतिक्रिया

रितेश पत्नी जिनिलीयाची प्रतिक्रिया सांगत म्हणाला, “माझ्या आयुष्यात जे काही घडतं, त्याबद्दल सर्वात आधी मी जिनिलीयाला सांगतो, कारण तिचं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. माझ्यासाठी कोणती गोष्ट सर्वात चांगली आहे याचा ती नेहमी विचार करते. ती मला वेगळा दृष्टीकोन देते. जिनिलीयाने मला आयुष्यात नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि मला हा शो खूप आवडतो हे तिला माहित आहे. मी मराठी भाषा आणि सिनेमासाठी किती पॅशनेट आहे, याची तिला कल्पना आहे. ‘तुला हा शो करायला खूप आवडेल त्यामुळे मी याबद्दल उत्साहित आहे,’ असं ती म्हणाली.”

Riteish Deshmukh wife Genelia
रितेश देशमुख व त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख (फोटो – इन्स्टाग्राम)

Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर ते ‘कलर्स मराठी’ची लाडकी सून! ‘हे’ आहेत ‘बिग बॉस’च्या घरातील १६ स्पर्धक

रितेश देशमुखचा हिंदी व मराठी ‘बिग बॉस’मधील आजवरचा आवडता शिव ठाकरे आहे असंही त्याने सांगितलं. ‘बिग बॉस मराठी ५’ हा शो दररोज रात्री ९ वाजता ‘कलर्स मराठी’ वर प्रसारित होईल.

Story img Loader