Bigg Boss Marathi 5 Finale Voting: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व आधीच्या चार पर्वांच्या तुलनेत खूप गाजले. या घरातील स्पर्धकांची भांडणं असो, टास्क खेळणं असो, लव्ह अँगल असो या सर्वच गोष्टींना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या शोने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले. आता ७० दिवसांनी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविवारी (६ ऑक्टोबरला) संध्याकाळी सहा वाजता बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.
रितेश देशमुखने पहिल्यांदाच होस्ट केलेला हा शो यंदा सर्वाधिक चर्चा झालेला शो ठरला. या शोमध्ये नुकत्याच झालेल्या मिड वीक एव्हिक्शनमध्ये वर्षा उसगांवकर बाहेर पडल्या. त्यानंतर आता निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर हे या शोचे टॉप सहा स्पर्धक आहेत. यापैकी आणखी एक सदस्य आज बाहेर जाईल.
हेही वाचा – Bigg Boss 18: सलमान खानचा शो केव्हा, कुठे पाहता येणार? जाणून घ्या प्रिमियरची तारीख अन् स्पर्धकांची नावं
Bigg Boss Marathi 5 Grand Finale: या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच दोन दिवसांनी ग्रँड फिनाले होणार आहे. या उर्वरित सदस्यांपैकी एक विजेत्याची ट्रॉफी तसेच बक्षिसाची रक्कम घेऊन घरी जाईल. ग्रँड फिनालेचा विजेता ठरवण्यासाठी उद्या (५ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजेपर्यंत वोटिंग लाइन्स सुरू असणार आहेत. तुम्हाला तुमच्या आवडत्या स्पर्धकाला वोट करायचे असेल तर त्यासाठी काय करावे लागेल, ते जाणून घेऊयात.
हेही वाचा – Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले विनामूल्य कधी व कुठे पाहता येणार? ‘या’ दिवशी ठरणार पाचव्या पर्वाचा विजेता
जिओ सिनेमावर आवडत्या स्पर्धकाला वोट कसे करायचे?
बिग बॉस मराठीतील तुमच्या आवडत्या स्पर्धकाला वोट करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, ते जाणून घ्या.
- सबस्क्रिप्शन घ्या – सर्वात आधी तुम्हाला जिओ सिनेमा प्रिमिअम सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. सबस्क्रिप्शन २९ रुपयांत मिळते. तुम्ही सबस्क्रिप्शन घेतल्यावर तुम्हाला वोट करता येते.
- साईन इन करा: जिओ सिनेमा अॅपवर जा, तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा आणि सर्च बॉक्समध्ये जाऊन Bigg Boss Marathi 5 शोधा.
- वोटिंग फीचर शोधा: शोच्या पेजवर जा आणि तुम्हाला जोपर्यंत वोटिंग सेक्शन दिसत नाही, तोपर्यंत स्क्रोल करा.
- तुमच्या आवडत्या स्पर्धकाला वोट करा: सर्वात खाली गेल्यावर तुम्हाला तिथे सदस्यांची नावं त्यांच्या फोटोसह दिसतील. त्या फोटोवर क्लिक करून तुम्ही त्यांना वोट करू शकता.
- वोट सबमिट करा: तुम्ही आवडता स्पर्धक निवडल्यावर वोट करून सबमिट करा. एकाच अकाउंटवरून तुम्ही अनेक वोट करू शकता.